शहरं
Join us  
Trending Stories
1
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
2
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
3
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
4
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
5
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
6
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
7
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
8
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
9
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
10
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
11
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
12
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
13
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
14
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
16
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
17
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
18
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
19
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
20
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'

नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 6:20 PM

नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचत आहे.

नायगाव - गेल्या चार दिवसांपासुन नायगाव खो-यात होत असलेल्या पावसामुळे पीक सडु लागली आहे.महागड्या कांदा पिकाचे अतोनात नुकसान होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चारपाच दिवसांपासून दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतातील पिकांमध्ये पाणी साचत आहे.शेतातील पिके साचणा-या पाण्यामुळे सध्या अक्षरशः पिवळे पडुन सडु लागली आहे.मागील महिन्यात खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.सध्या नायगाव खो-यात दररोज पाऊस हजेरी लावत आहे.त्यामुळे शेतातील पिकांमधुन पाणी वाहू लागले आहे.कांदा बियाण्यांची टंचाई असतांनाही शेतकरी महागडी बियाणे खरेदी करून सध्या लागवड करत आहे.याच कांदा क्षेत्रात सध्या दररोज होणाऱ्या पावसाचे पाणी साचत असल्यामुळे शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत आहे.कांदा बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक शेतक-यांनी कोथिंबीर,मेथी,शेपु,टमाटे,मिरची आदी भाजीपाल्याचे पिके घेतली मात्र या पिकांचेही या पावसामुळे मोठे नुकसान होत आहे.सर्वच पिके सडु लागल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.अशा परस्थितीत शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी सध्या शेतकरी वर्गाकडुन केली जात आहे.चौकट - खरिपा पाठोपाठ सध्या दररोज येणाऱ्या पावसामुळे रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे.मी गेल्या आठवड्यात दोन एकर लाल कांद्याची लागवड केली आहे.मात्र चारपाच दिवासांपासून दररोज येणाऱ्या जोरदार पावसामुळे लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचत आहे. या शेतात पाणी साचल्यामुळे कांदा पिक पिवळे पडुन सडु लागली आहे.शासनाने परिसरातील सर्वच पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची गरज आहे.

- रघुनाथ दिघोळे. शेतकरी. जायगाव

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती