शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
4
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
5
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
6
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
7
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
8
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
9
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
10
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
11
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
12
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
13
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
14
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
15
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
16
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
17
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
18
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
19
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
20
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन

साकोरा परिसरात पावसाचे आगमन

By admin | Updated: July 15, 2014 00:51 IST

साकोरा परिसरात पावसाचे आगमन

साकोरा : पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना उलटल्याने परिसरातील शेतकरी हवालदिल झाले होते. काल सायंकाळी पावसाने जोरदार सलामी दिल्याने बळीराजा तूर्त शेतीकामात व्यस्त झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे रात्रभर अंधारात बसावे लागल्याने गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.गतवर्षी या महिन्यात परिसरात कोळपणी व निंदणीची कामे जोरात सुरू होती. मात्र यावर्षी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे नांदगाव तालुक्यातील ईशान्येकडील साकोरासह, वेहळगाव, कळमदरी, जामदरी, सावरगाव, पळाशी, मंगळाणे, नवेपांझण, मुलडोंगरी, मंगळणे, गिरणाडॅम गावांतील पेरण्या खोळंबल्या आहेत. काल सायंकाळी पावसाने नांदगावसह साकोरा परिसरात जोरदार सलामी दिल्याने नांदगाव-साकोरा रस्त्यावरील मोरखडी धरण पाण्याने अर्धे भरले. या पावसामुळे परिसरातील काही भागात पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज दिवसभर नांदगावच्या बाजारपेठेत बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती.गेल्या दोन-तीन वर्षांपासून या परिसरात होणाऱ्या पहिल्याच पावसात जतपुरा शिवारात वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये दरवर्षीप्रमाणे बिघाड झाल्याने साकोरेकरांना रात्र-रात्र अंधारात बसावे लागत आहे. यावर्षीदेखील याचठिकाणी काल झालेल्या पावसामुळे किरकोळ बिघाडामुळे नागरिकांना तब्बल वीस तास अंधारात बसून डासांचा व प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. काल सायंकाळी हा बिघाड झाला. गावात एकच स्थायिक वीज कर्मचारी असून, बाकी सर्व बाहेरगावी राहतात. नांदगाव शहरात दहा हजार लोकसंख्या असताना २० ते २५ कर्मचारी राहतात. मात्र साकोऱ्यात ७५ रोहित्र व चार हजार वीजग्राहकांसाठी केवळ एकमेव कर्मचारी असल्याने गावावर एक प्रकारे अन्याय केला जात आहे. या कर्मचाऱ्याने सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन गावाचा वीजपुरवठा सुरळीत केला. गावात पुरेसे वीज कर्मचारी नेमावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)