शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या निवेदनांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 01:25 IST

मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन सकल मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणीच्या शेकडो निवेदनांचा पाऊस सोमवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर पडला.

नाशिक : मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन सकल मराठा समाजास आरक्षण देण्याची मागणीच्या शेकडो निवेदनांचा पाऊस सोमवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर पडला. जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय संघटनांसह शंभरपेक्षा अधिक व्यक्तींकडून एकूण ५३५ निवेदने समितीला प्राप्त झाली असून लवकरच गावांमध्ये थेट सर्वेक्षण करून यासंबंधी अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली.  मराठा आरक्षणासाठी सरकारने स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभर जनसुनावणी घेण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्णातील संस्था, संघटना व समाजाच्या भावना जाणून घेण्यासाठी सोमवारी सकाळी ११ ते ५ या वेळेत शासकीय विश्रामगृहावर सुनावणी ठेवण्यात आली. याप्रसंगी आयोगाचे अध्यक्ष एम. जी. गायकवाड यांच्यासह सदस्य डॉ. डी. डी. बाळसराफ, डॉ. प्रमोद येवले, सी. व्ही. देशपांडे, डॉ. सुवर्णा रावल, डॉ. भूषण कडिर्ले, सुधीर ठाकरे, डी. डी. देशमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड, बळीराजा फाउंडेशन, जिजाऊ ब्रिगेड, छावा आदी शंभरावर संघटनांनी आपल्या मागण्यांचे निवेदने सादर केली. त्यात प्रामुख्याने मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास असून मराठा व कुणबी हा एकच समाज असल्याने त्यांना आरक्षण देण्यात यावे, आजोबा, पणजोबा यांच्या जातीच्या दाखल्यावर कुणबी असा उल्लेख असताना नातवांच्या दाखल्यावर मराठा असा उल्लेख आहे. याबाबतचे पुरावे यावेळी समितीला सादर करण्यात आले. मराठा व कुणबी यांच्यात रोटी-बेटीचा व्यवहार होत असल्याचे दाखलेही देण्यात आले.  समितीसमोर प्राप्त झालेल्या निवेदनांनी माहिती सायंकाळी प्रसिद्धीमाध्यमांना देण्यात आली. या सर्व संदर्भांचा व पुराव्याचा बारकाइने अभ्यास करून समिती आपला अहवाल सरकारकडे सादर करणार असून, तत्पूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील २ गावांचा नमुनेदाखल सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून कोकण विभागाचा सर्व्हे सुरू आहे. यानंतर लवकरच नाशिक विभागात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात विभागातील एक महापालिका व नगरपालिकेचादेखील समावेश आहे. साधारणत: एक ते तीन हजार लोकसंख्या व मराठा समाजाचे प्राबल्य असणाऱ्या गावांची यात निवड केली जाणार आहे. दरम्यान, आयोगातर्फे दि.५ जून रोजी जळगाव येथे व दि.२७ जून रोजी पुणे येथे जनसुनावणी घेण्यात येणार असल्याची माहिती आयोगातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समाज कल्याण विभागाचे राजेंद्र कलाल, उपायुक्त प्राची वाजे, देवीदास नांदगावकर आदी उपस्थित होते.ग्रामीण-शहरी गावांमध्ये होणार सर्वेक्षणआयोगातर्फे प्रत्येक जिल्ह्णातील पाच तालुक्यांमधील दोन गावांचा सॅम्पल सर्व्हे करण्यात येणार आहे. मराठवाड्याचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, सध्या कोकण विभागाचा सर्व्हे सुरू आहे. यानंतर लवकरच नाशिक विभागात सॅम्पल सर्व्हे करण्यात येणार आहे. साधारणत: एक ते तीन हजार लोकसंख्या व मराठा समाजाचे प्राबल्य असणाºया गावांची यात निवड केली जाणार आहे. या सर्वेक्षणात विभागातील एक महापालिका व नगरपालिका हद्दीतील गावांचादेखील समावेश असणार असल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :marathaमराठा