सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील काही गावांना वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करणेसाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन पंचनामे केले.दोन आँक्टोबर रोजी ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील निनावी, भरविहीर, धामणी, पिंपळगाव घाडगा, पिंपळगाव डुकरा आदीगावांमध्ये सायंकाळी गारपिट व वादळी वाºयासह पाऊस झाला. परतीच्या पावसाने या परिसराला चांगलेच झोडपुन काढले. या पावसाने अनेकांच्या घरांची पडझड झाली, काहींच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती पडल्या तर भात, टोमॅटो, ऊस, काकडी यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. ईगतपुरी तालुका शिवसेना गट प्रमुख साहेबराव झनकर, गणेश टोचे, मधुकर टोचे, शिवाजी भोर, विनोद जोशी, रामनाथ टोचे, ग्यानेश्वर टोचे, चंदर भगत यांनी आमदार वाजे यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी यासाठी भेट घेऊन माहीती दिली. तसेच ईगतपुरीच्या तहसीलदार वंदना खरमाले यांना आमदार वाजे यांनी पत्र देऊन, टाकेद विभागाचे सर्कल बाईकर, तलाठी पवार, कृषि सहायक पवार व बिन्नर यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांसह पहाणी करून तहसीलदारांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले आहेत. व नुकसान ग्रस्त शेतकरी यांना साहेबराव झनकर, जि. प. सदस्य हरिदास लोहकरे, रामचंद्र परदेशी, ग्यानेश्वर लगड यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.या वादळी वाºयामुळे विद्युत मंडळांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. मेन लाईनचे पोल पडून विद्युत वाहक तारा तुटून विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. सहायक अभियंता दोरण व मुख्य तंत्रज्ञ रतन बांबळे व त्यांच्या टिमने दोन दिवसात काम करून विद्युत पुरवठा सुरू केल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले.
पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसान पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:24 IST
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील काही गावांना वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करणेसाठी आमदार राजाभाऊ वाजे यांनी तहसीलदार यांना लेखी पत्र देऊन पंचनामे केले.
पाऊस, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसान पंचनामे
ठळक मुद्देइगतपुरी : लोकप्रतिनिधी, अधिकाºयांची घेतली भेट