शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

पावसामुळे फटाके विक्र ीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 00:53 IST

काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे.

नाशिक : काही दिवसांपासून शहरात सुरू असलेली पावसाच्या सरींमुळे फटाका विक्रीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. यावर्षी ४४२ स्टॉलपैकी फक्त १३६ स्टॉलचा लिलाव झाला आहे. महापालिकेने यंदा फटाके विकण्यासाठी फक्त ४ दिवस दिल्यामुळेही स्टॉलच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. तसेच ग्राहकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे विक्रीवर याचा परिणाम झाल्याचे दिसत असले तरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यास यात वाढ होण्याची शक्यता फटाका असोसिएशनच्या वतीने सांगण्यात येत आहे.महापालिकेकडून दरवर्षी दिवाळीत पोलीस परवानगीच्या अधीन राहून फटाके स्टॉलच्या जागेचे लिलाव जाहीर केला जातो. यंदा आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने ही प्रक्रियेसाठी सप्टेंबरमध्येच लिलाव काढले होते.यावर्षी विभागातील २७ ठिकाणी ४४२ फटाके स्टॉल विक्रीसाठी उभारणीसाठी लिलाव काढले होते. त्यात २५ ते २९ आॅक्टोबर या दिवसांतच फटाके विक्री करण्याची अट महापालिकेने घातल्याने फक्त १३६ स्टॉलना लिलावात बोली लावण्यात आली. त्यामुळे ३०६ स्टॉल रिकामेच राहिले.महापालिकेकडून शहरातील नाशिकरोड, सातपूर, सिडको, पंचवटी, डोंगरेवसतिगृह, गोल्फ क्लब मैदान याठिकाणी फटाके विक्रीसाठी स्टॉल उपलब्ध करून दिले होते. स्टॉलच्या भाड्याचा न परवडणारा खर्च तसेच सततचा पडणारा पाऊस यामुळे यंदा स्टॉलची पाहिजे तसी विक्री होऊ शकली नाही.तसेच पावसामुळे ग्राहकांनीही फटाके खरेदीकडे काही प्रमाणात पाठ फिरविल्यामुळे स्टॉलधारक संकटात पडले आहे.काही दिवसांपासून पडणारा पाऊ स तसेच महापालिकेकडून मोजके दिवस विक्रीसाठी दिल्यामुळे यंदा स्टॉलचे प्रमाण घटले आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण कमी होत असून, शहरात मोजक्या ठिकाणीच स्टॉल उपलब्ध होणार आहे. यंदा प्रदूषणविरहित फटाक्यांना मागणी असून, ग्राहकांचीही याला पसंती लाभत आहे.- जयप्रकाश जातेगावकर, अध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशनपावसामुळे फटाके विक्रीवर परिणाम होत असून, यामुळे ग्राहकही घराबाहेर पडत नाही. लक्ष्मीपूजनच्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यास यात वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी दहा हजारांची लढ तसेच मोठ्या आवाजाचे फटाके कमी झाल्यामुळे यंदा प्रदूषणविरहित फटाक्यांना मागणी आहे. स्टॉलची संख्या कमी झाली असली तरी पुढील दिवसांत ग्राहकांची प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.- अमोल बर्वे, उपाध्यक्ष, नाशिक फटाका असोसिएशन

टॅग्स :RainपाऊसDiwaliदिवाळीCrackersफटाके