नाशिक : शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणानंतर सायंकाळी अनेक भागात पाऊस झाला. त्याचा परिणाम म्हणून शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाला.गेल्या आठवड्यात दोन ते तीन दिवस नाशिक शहरात नीचांकी तपमानाची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक थंडीची नोंद नाशिक शहरात झाली. त्यानंतर ढगाळ वातावरणाला सुरुवात झाली. गेल्या चार ते पाच दिवसांपासून असेच वातावरण असून, गेल्या शनिवारपासून शहरासह जिल्ह्यात पाऊसही हजेरी लावत आहे. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळनंतर पावसाची रिमझिम सुरू झाली. रात्री पाऊस सुरू असतानाच शहराच्या विविध भागात विजेचा लपंडाव सुरू झाला. त्यामुळे व्यावसायिक बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. पावसाची हजेरी बघितल्यानंतर रिक्षा सेवेचे दरही वधारले. रात्री पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)
शहरात तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी
By admin | Updated: November 23, 2015 23:50 IST