मेशी : मेशीसह परिसरात महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके कोमेजू लागली आहेत. सलग पाच वर्षांपासून पावसाने वक्रदृष्टी दाखविली आहे. खरीप हंगामातील बाजरी, मका, मूग, भुईमूग, तूर आदि पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे बळीराजा कमालीचा संकटात सापडला आहे. गणपतीकाळात तरी पाणी पडेल या आशेने शेतकरी वाट पाहत आहेत. मोठ्या आशेने कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली; मात्र अपेक्षाभंग झाला आहे. कांदा पिकास बाजारभाव नाही. खरीप आता नाहीसा होत आहे. बाजरी पिकास कणीस लागले आहेत. दाणे भरणा सुरू आहे, पाणी आवश्यक आहे.
पावसाने दडी मारली, पिके कोमेजू लागली
By admin | Updated: September 5, 2016 00:46 IST