लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने दोन दिवसांपासून दडी मारल्याने शेतकऱ्यांचा ठोका पुन्हा चुकला आहे. विशेष म्हणजे हवामान खात्याने रविवार व सोमवार असे दोन दिवस मध्य-उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा व्यक्त केलेला अंदाजही फोल ठरला आहे. यंदा जून महिन्यात मान्सूनने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला वेग दिला आहे. विशेष करून त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा व पेठ या तालुक्यांमध्ये भाताची आवणी करण्याजोगी परिस्थिती असली तरी, अजून एक किंवा दोन दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आवणी झाल्याखेरीज लावणी होत नाही. आवणी उशिरा झाल्यावर लावणीसाठी पुन्हा पाण्याची गरज असते असे असताना पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. रविवार व सोमवारी जिल्ह्यात कोठेही पावसाची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हवेतील उकाड्यातही काही अंशी वाढ झाली आहे.
शहरात पावसाने मारली दडी
By admin | Updated: June 27, 2017 01:05 IST