नाशिक : तपमानाचा पारा अनियमित स्वरूपात कमी-जास्त होत असल्याने पावसाची केवळ भूरभूरच झाल्याने नाशिककरांना अद्यापही जोरदार मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस हजेरी लावत नसल्याने उष्मा कायम आहे. केवळ पहाटेच्या सुमारासच थोडासा दिलासा मिळतो. जोरदार वारे पावसाचे ढग वाहून नेत असल्याने त्याचाही फटका मान्सूनला बसला आहे.काही दिवसांपूर्वी पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्याने आता मान्सून जोर धरेल अशी अपेक्षा होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही त्यासाठी मशागत सुरू केली होती, परंतु त्या दिवसानंतर पावसाने दिलेली ओढ अद्यापही कायम असल्याने आता तरी वरुणराजाने हजेरी लावावी, अशी अपेक्षा व्यक्त होते आहे. दरम्यान, सकाळपासून आकाशात ढगांनी गर्दी केल्यानंतरही दुपारच्या सुमारास वातावरणात अधिकच उष्मा जाणवू लागल्याने आज मुसळधार पाऊस होईल, असे वाटत होते. परंतु रात्री उशिरापर्यंत केवळ प्रतीक्षाच नाशिककरांच्या नशिबी आली. किमान तपमान २४, तर कमाल तपमानाचा पारा सोमवारी ३० अंशावर होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्रात पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
पावसाने मारली दडी
By admin | Updated: July 6, 2015 23:57 IST