शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

रेल्वे वाहतूक विस्कळीत

By admin | Updated: July 12, 2014 00:29 IST

रेल्वे वाहतूक विस्कळीत

नाशिकरोड : मुंबईहून नाशिकला येणाऱ्या (डाऊन) रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळील आटगांव येथे पहाटे मालगाडीचे इंजिन नादुरूस्त झाल्याने मध्य रेल्वेची मुंबई-नाशिक रेल्वे सेवा तीन तास विस्कळीत झाली. यामुळे मुंबईहून येणाऱ्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मालगाडीचे इंजिन आज पहाटे चार वाजेच्या सुमारास कसाऱ्याजवळील आटगांव येथे नादुरूस्त झाले. यामुळे मुंबईहून येणाऱ्या मुंबई-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, दादर-गोरखपूर काशी एक्स्प्रेस, मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस एक तास, मुंबई-भुसावळ पॅसेंजर पावणेदोन तास व दादर-गोहाटी एक्स्प्रेस अर्धा तास उशिराने धावत होत्या. मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मुंबईहून सुटलेल्या रेल्वे टप्याटप्याने थांबविण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास व दगदग सहन करावी लागली. सकाळी ७ वाजेच्या सुमारास मालगाडी डाऊन मार्गावरून हलविल्यानंतर मुंबई-नाशिक रेल्वेसेवा हळुहळु पूर्वपदावर आली.मुंबई-ठाणे परिसरात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचले होते. यामुळे मुंबईहून येणाऱ्या गोदावरी, सेवाग्राम एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ या गाड्या अर्धा तास उशिराने धावत होत्या. नाशिकरोड रेल्वे स्थानक गर्दीने फुलून गेले होते. (प्रतिनिधी)दूरध्वनी सेवा खंडित; बॅँकांचे व्यवहार ठप्पवडनेरभैरव : येथे गेल्या तीन दिवसांपासून भारत दूरसंचारची सेवा विस्कळीत झाल्याने बॅँका, पतसंस्था व सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत.दूरध्वनी केंद्राकडे येणारी आॅप्टिकल फायबरची लाइन वडाळीभोईजवळ अचानक तुटल्याने वडनेरभैरव परिसरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले तर बॅँक आॅफ महाराष्ट्रमधून इंटरनेट बंद झाल्याने एकही व्यवहार होऊ शकले नाही.