शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कसारा घाटात रेल्वेमार्गावर पुन्हा दरड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:16 IST

दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात शुक्रवारी (दि. २६) पहाटे रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने गाडी थांबविल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वीच घाटातील बोगद्याबाहेर दरड कोसळली होती.

इगतपुरी : दोन दिवसांपासून घाटमाथ्यावर पडत असलेल्या पावसामुळे कसारा घाटात शुक्रवारी (दि. २६) पहाटे रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळली. याचवेळी मुंबईला जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेस चालकाच्या ही बाब लक्षात आल्याने त्याने गाडी थांबविल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वीच घाटातील बोगद्याबाहेर दरड कोसळली होती. आठवडाभरापूर्वी अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा रेल्वे घाटातील पुलावर रु ळावरून घसरल्याने मोठी दुर्घटना टळली होती. तसेच मुंबई-आग्रा महामार्गावरदेखील दोन वेळा दरड व एक वेळा झाड कोसळण्याची घटना घडली होती.इगतपुरी परिसरातील घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे शुक्रवारी घाटातील मुंबईच्या दिशेने जाणाºया तीन नंबर बोगद्याजवळ रेल्वेमार्गावर दरड कोसळली. याच रु ळावरून मुंबईच्या दिशेने देवगिरी एक्स्प्रेस जात होती. घाटात धुके असूनही देवगिरीच्या चालकाला ही दरड कोसळल्याचे लक्षात येताच त्यांनी गाडी थांबविल्याने अनर्थ टळला. या घटनेची माहिती चालकाने रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी एस.एस. बर्वे, स्टेशनमास्तर प्रेमचंद आर्य यांना दिली. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच रेल्वे आपत्कालीन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रु ळावर पडलेली दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले. या घटनेमुळे मुंबईला जाणारी देवगिरी एक्स्प्रेस सुमारे दीड तास कसारा घाटात उभी होती. रेल्वे रु ळावरील दरड काढल्यानंतर २मुंबईला रवाना करून रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, मुंंबईला जाणारी व मुंबईहून येणारी वाहतूक सुरळीत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे