शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सब-वे बाबत रेल्वे प्रशासनाचे घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 23:04 IST

नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने घूमजाव करीत सब-वे शेजारी भिंत बांधण्याची सुरुवात केल्याने लक्ष्मी थिएटर्स जवळील नागरिकांचा संपर्क पुन्हा खंडित झाला आहे.

ठळक मुद्देनांदगाव : भिंत बांधकामामुळे नागरिकांचा संपर्क खंडित

नांदगाव : रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करून अपघात घडणार नाही याची काळजी घेण्याचे, रेल्वे स्थानक नजीक रेल्वे येत असताना गती कमी ठेवण्यासंदर्भात सूचना देण्याचे व रेल्वे येत असल्यास तसा अलार्म लावून नागरिकांना सावध करण्याचे लेखी आश्वासन देणाऱ्या रेल्वे प्रशासनाने घूमजाव करीत सब-वे शेजारी भिंत बांधण्याची सुरुवात केल्याने लक्ष्मी थिएटर्स जवळील नागरिकांचा संपर्क पुन्हा खंडित झाला आहे.रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या या मनमानी कारभारामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या सोबत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी, भुसावळ विभागाचे मंडळ महाप्रबंधक एस.एस केडिया यांनी घेतलेल्या वेबेक्स बैठकीला सब-वेतील असलेल्या दोषांची दुरुस्ती करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानंतर सब-वेत साचलेल्या पाण्यामुळे जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने रेल्वे क्रॉसिंग करण्याच्या प्रयत्नात रविवारी एका भाविक महिलेचा मृत्यू झाला. संतप्त नागरिकांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात जाब विचारला तेव्हा लेखी आश्वासन देण्यात आले होते.

सोमवारी (दि.११)त्याप्रमाणे आरपीएफ नियुक्त देखील करण्यात आले. मात्र दुपार नंतर लक्ष्मी थिएटर्स कडील वापरात नागरिकांचा मार्ग लोखंडी जाळी लावून अचानक बंद करण्यात आला. शिवाय सबवे लगत लेंडी नदी शेजारील रस्त्यावर भिंत उभारण्याच्या कामाला सुरुवात झाल्याने संतप्त नागरिकांच्या दुखण्यावर मीठ चोळले गेले.आले अधिकाऱ्यांच्या मना...!एकीकडे सब-वेत असलेल्या तांत्रिक आराखड्यातील दोष दूर करण्याची ग्वाही द्यायची अन् दुसरीकडे दिलेल्या आश्वासनाचा शब्द पाळण्याऐवजी चक्क वेठीला धरायचे अशा लहरी कारभाराला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे. केंद्रात थेट मंत्रिमंडळात असणाऱ्या राज्यमंत्र्यालाच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याऐवजी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने दिलेल्या सूचना झुगारत मनमानी सुरु केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. त्यामुळे ह्यआले रेल्वे अधिकाऱ्यांच्या मना, तेथे कुणाचे चालेनाह्ण असा विचित्र अनुभवाला नागरिकांना सामोरे जाण्याचा प्रसंग उदभवला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेroad safetyरस्ते सुरक्षा