नाशिक : तपोवनातील जलशुद्धीकरण केंद्राच्या बाजूला तसेच नाशिकरोड श्रमिकनगर परिसरातील जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे साडेचार हजार रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ आडगाव पोलिसांनी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास तपोवनातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित राजेश पटेल (पिंटू कॉलनी, जेलरोड, नाशिकरोड) यांना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून तीन हजार ९९० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, आडगाव पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
आडगाव, नाशिकरोडला जुगार अड्ड्यांवर छापे
By admin | Updated: January 30, 2017 23:13 IST