नाशिक : नाशिकरोड, सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर शुक्रवारी (दि़९) पोलिसांनी छापे टाकून सोळा जुगाऱ्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोकड जप्त केली आहे़ नाशिकरोडच्या वास्को चौकातील एका हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला़ या ठिकाणी संशयित किसन सिरसाठ व त्याचे चार साथिदार अशा पाचही जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भद्रकाली पोलिसांनी खडकाळीतील मशिदीजवळील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास छापा टाकला़ या ठिकाणी संशयित कृष्णा जाधव (रा़ खंबाळे, ता़ त्र्यंबकेश्वर) व त्याचे तीन साथिदार मेनस्टार लाईन नावाचा जुगार खेळत होते़ या चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे़ (प्रतिनिधी)
शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
By admin | Updated: September 11, 2016 01:43 IST