शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील अवैध मद्य, जुगार अड्ड्यांवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:33 IST

नाशिक : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करायची कोणी? याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यानंतर शहर पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. ...

ठळक मुद्देपोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये : ५१ संशयितांविरुद्ध गुन्हे; ६३ हजारांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करायची कोणी? याबाबतचा प्रश्न अखेर मार्गी लागल्यानंतर शहर पोलीस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. पोलीस आयुक्तालयाच्या १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी धाडसत्र राबवून बेकायदेशीरपणे जुगार चालणारे, मद्यविक्रीचे अड्डे उद‌्ध्वस्त केले. एकूण २४ गुन्ह्यांमध्ये सुमारे ५१ संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या आदेशानंतर शहरातील परिमंडल-१ व २च्या हद्दीत अवैधरीत्या दारू, जुगार, मटक्याच्या अड्ड्यांवर पोलिसांनी अचानकपणे बुधवारी मध्यरात्री जोरदार धाडी टाकल्या. उपायुक्त अमोल तांबे, विजय खरात यांच्या नेतृत्वाखाली आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, मुंबई नाका, गंगापूर, सातपूर, इंदिरानगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांसह गुन्हेशाेध पथकांनी आपापल्या हद्दीत अवैध दारू विक्री, जुगार अड्ड्यांचा शोध घेत कारवाई केली. महाराष्ट्र जुगार कायदा कलम व महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये कारवाई करत शहरातील २४ अवैध धंद्यांवर टाच आणली. यावेळी जुगार खेळताना व मद्यविक्री करताना आढळून आलेल्या संशयितांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये ६३ हजारांचा मद्यसाठा, जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये ३८ हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच सिगारेट, तंबाखू उत्पादने अधिनियम २००३सह सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ सुधारणा नियम २०१४ नुसार ७६०० रुपये किमतीचा तंबाखू, सिगारेटचा बेकायदेशीर मालाचा साठाही जप्त करण्यात आला आहे.शहरातील अवैध दारूविक्रीचे अड्डे असो किंवा जुगार अड्डे असो हे कायमस्वरूपी बंद व्हावे, अशीच नाशिककरांची अपेक्षा आहे. अवैध धंद्यांविरोधी पोलिसांनी पुन्हा मोहीम हाती घेतली असली तरी ही मोहीम कायम सुरू रहावी आणि महसूल, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या यंत्रणेनेही परवाने तपासावे, तसेच जुगार अड्ड्यांबाबतही तपासणी महसूलच्या संबंधित लॉटरी विभागाकडून करण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी