शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कादवाचे विस्तारीकरण आवश्यक : श्रीराम शेटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 01:46 IST

शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .

दिंडोरी : शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . त्यासाठी गाळप वाढणे गरजेचे आहे. कादवाच्या कार्यक्षेत्रात यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, जिल्ह्यातील ऊस उत्पादकही कादवाला ऊस देण्यासाठी उत्सुक आहेत. वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी कमी दिवसात जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी केले .  कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४२ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा चेअरमन शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बॉयलर पूजन कारखान्याचे ऊस उत्पादक सभासद सौ व श्री पाटीलबुवा हरिभाऊ बर्डे, सौ. व श्री तानाजी निवृत्ती कामाले यांच्या हस्ते झाली.पुढे बोलताना श्रीराम शेटे म्हणाले, आपण गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणावर मशिनरीत बदल , दुरुस्ती केल्यामुळे आज कारखाण्याची गाळप क्षमता वाढली असून गळीताचे दिवस कमी झाले. आपल्याला फक्त साखरेवर विसंबून न राहता भविष्याची परिस्थिती ओळखून विस्तारीकरण तसेच इथेनॉल प्रकल्प उभारणीच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. टप्प्या टप्प्याने द्यावयाचे एफआरपी बद्दल बोलताना ते म्हणाले बँक आपल्याला साखर पोत्यावर १७०० ते १८०० रु पये उचलदर देईल त्यात थोडेफार पैसे टाकून पहीला हप्ता २००० व उर्वरीत रक्कम ही हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, गणपतराव पाटील, दत्तात्रय पाटील, बाळासाहेब देशमुख, आत्माराम पाटील, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे आदींनी मनोगत व्यक्त केले.पूर्वी पूर्व भागात ऊस होता तेव्हा कपाती झाल्या म्हणूनच आज कारखाना उभाआहे हे विसरता येणार नाही २००७ ला काय परिस्थिती होती आज काय आहे हे समजून घ्या विस्तारीकरण डीस्टिलरी इथेनॉल हे यापूर्वीच व्हायला हवे होते आता संधी आली आहे ती सोडू नये.- आत्माराम पाटील, सोनजांबकारखान्याच्या विकासाच्या दृष्टीने विस्तारीकरन व इथेनॉल प्रकल्प उभारणीला आमचा विरोध नाही हवेतर शेअर्सची किंमत वाढवा परंतु ऊस बिलातून कोणीतीही रक्कम कपात करू नये.- बाळासाहेब देशमुख , लखमापूर

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने