शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दापूरच्या तांगा शर्यतीत राडा :  पोलिसांच्या पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 02:05 IST

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे तेलमाथा परिसरात खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तांगा शर्यतीत बेफाम झालेल्या शौकिन व ...

सिन्नर : तालुक्यातील दापूर येथे तेलमाथा परिसरात खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तांगा शर्यतीत बेफाम झालेल्या शौकिन व जमावाने वावी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केल्याची घटना सोमवारी (दि.२१) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. यात वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपुकमार बोरसे, एक शिपाई व पोलीसमित्र जखमी झाले आहेत.दापूर येथे खंडेराव महाराज यात्रेनिमित्त तेलमाथा परिसरात अनधिकृतपणे तांगा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. गुप्त माहितीच्या आधारे वावी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठ कार्यालयाकडूनही या शर्यतीबाबत वावी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक  संदीपकुमार बोरसे, उपनिरीक्षक मुख्तार सय्यद, एल. टी. भोसले, हवालदार प्रवीण अढांगळे, सुधाकर चव्हाणके, उमेश खेडकर, प्रकाश उंबरकर, अजित जगधने यांच्यासह पोलीस कर्मचारी शासकीय व खासगी वाहनाने दापूरच्या तेलमाथा परिसरात दाखल झाले. याठिकाणी सुरू असलेल्या तांगा शर्यतीबाबत त्यांची चौकशी करण्यास प्रारंभ करताच शौकिनांनी त्यांना मज्जाव करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर संतप्त झालेल्या शौकिनांनी पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली. सुमारे एक हजाराचा जमाव संतप्त झाल्याने उपस्थित पोलीस पथकाला माघार घ्यावी लागली. त्यानंतर संतप्त शौकिनांनी पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक करण्यास प्रारंभ केला.पोलीस पथक बॅकफुटवर गेल्यानंतरही दगडफेक सुरूच होती. या दगडफेकीत वावी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे व शिपाई सुधाकर चव्हाणके जखमी झाले. बोरसे यांच्या मानेवर दगड लागल्याने मोठी जखम झाली, तर चव्हाणके यांच्या हाताला व पायाला दुखापत झाली, तर पोलीसमित्र नारायण घोटेकर यांच्या हाताला गंभीर जखम झाले. जखमींवर दोडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदतीसाठी तातडीने दंगा नियंत्रण पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शौकिनांनी तोपर्यंत आपली वाहने, घोडे व बैल घटनास्थळावरून पळवून नेले होते. मदतीसाठी आलेल्या पोलिसांनी पीकअप जीप व दोन टाटाची छोटी वाहने ताब्यात घेतली आहेत. यात दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलीस फौजफाटा येईपर्यंत शौकिन व जमावाने धूम ठोकली होती.जखमी बोरसे व अन्य दोघांवर उपचार केल्यानंतर रुग्णालयातून सोडून देण्यात आले. निफाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक वावी पोलीस ठाण्यात घेऊन घटनेची माहिती घेत होते. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे काम वावी पोलीस ठाण्यात सुरू होते.वावी पोलिसांनी ताब्यात घेतलेली वाहने.गुन्हे दाखल करण्याचे काम सुरूअचानक पोलिसांवर तांगा शौकिनांनी दगडफेक केल्याने पोलीस अधिकाऱ्यासह तिघेजण जखमी झाल्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला होता. जमाव पसार झाल्यानंतर सर्वजण वावी पोलीस ठाण्यात आल्यानंतर छावणीचे रूप आले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाºयांच्या उपस्थितीत रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. याप्रकरणी वाहने ताब्यात घेणे व संशयितांची नावे शोधून काढण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिस