शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
3
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
5
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
6
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
7
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
8
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
9
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
10
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
11
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
12
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
13
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
14
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
15
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
16
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
17
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
18
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
19
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये रबीच्या आशा धूसर; कडधान्याचे भाव वाढले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 12:16 IST

बाजारगप्पा :नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत.

- संजय दुनबळे (नाशिक)

दिवाळीनंतर मागील सोमवारपासून कामकाज सुरू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भुसार मालाची आवक कमी झाली असून, भाव मात्र स्थिर आहेत. रबी हंगामाचा कोणताही अंदाज नसल्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कडधान्यांचे भाव किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढले आहेत. शेतमालाची आवक पाहून भाव ठरत असले तरी मक्याचे भाव अद्याप स्थिर असल्याचे दिसून आले. 

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दिवाळीनंतर गेल्या मंगळवारपासून भुसार मालाचे लिलाव सुरू झाले. येथे मक्याची सुमारे २०० टनाची आवक असून, कोरड्या मक्याला १४०० रुपये प्रतिक्विं टलचा दर मिळत आहे. बाजरीच्या आवकेत काहीशी घट झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत आहे. लासलगावी हरभरा, तूर, उडीद या कडधान्यांची आवक कमी झाली असून, सर्वच कडधान्यांचे भाव वाढले आहेत. हरभऱ्याला साधारणत: ४६०० ते ४७००, तुरीला ३७०० ते ३८०० रुपये, तर उडिदाला ४४०० ते ४५०० रुपये प्रतिक्विं टल दर मिळत असून, या कडधान्यांच्या दरात किलोमागे ८ ते ९ रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी सचिन ब्रह्मेचा यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच भागात पाऊस कमी झाल्याने विहिरींना पाणी नाही. त्याचबरोबर धरणांमधून सिंचनासाठी आवर्तन सुटेल की नाही याचाही अंदाज नसल्याने रबीचे पीक समोर दिसत नसल्याने कडधान्यांच्या दरात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. मालेगाव बाजार समितीत कडधान्याबरोबरच गव्हाचेही दर वाढले असल्याची माहिती भुसार मालाचे व्यापारी भिका कोतकर यांनी दिली. येथे गव्हाला किमान २७०० रुपये प्रतिक्विं टलचा भाव मिळत आहे. बाजरीची आवक कमी झाली असून, बाजरीला २००० ते २२०० रुपयांपर्यंत प्रतिक्विं टल दर मिळत आहे. या बाजार समितीतही कडधान्यांच्या दरात वाढ झाली असल्याचे कोतकर म्हणाले. 

आगामी काळात आवक अधिकच मंदावण्याची शक्यता असल्याने भुसार मालाचे भाव टिकून राहतील, असा अंदाज कोतकर यांनी व्यक्त केला. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्याची बऱ्यापैकी आवक असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती कमीच असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. बुधवारी येथे सुमारे १०० वाहनांतून मक्याची आवक झाली. १४११ रुपये प्रतिक्विं टलचा दर मक्याला जाहीर झाला. गहू, बाजरी, हरभरा, तूर, भुईमूग या शेतमालाची आवक किरकोळ स्वरूपात असून, त्यांचे भाव टिकून आहेत. येथे गहू २५०३ रुपये, तर भुईमूग ६३५१ रुपये प्रतिक्विं टल दराने विकला गेला. हंगामी मार्केट असलेल्या चांदवड बाजार समितीत केवळ मक्याची आवक होत आहे. येथे बुधवारी केवळ १६ वाहनांमधून मका विक्रीसाठी आला होता. भाव साधारणत: १३८१ रुपये प्रतिक्विं टलपर्यंत होते. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी