शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यात रब्बी पिकांचे क्षेत्र वाढले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 20:04 IST

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या

ठळक मुद्दे१२० टक्के पेरण्या पूर्ण : हरभरा घटला, कांदा वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : यंदा पावसाळ्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग आनंदात असताना रब्बीलाही हातभार लावण्यासाठी आॅक्टोबर महिन्यात झोडपून काढणाऱ्या अवकाळी पावसाने खरिपाचे नुकसान केले असले तरी, या पावसामुळे जमिनीखालच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होऊन परिणामी रब्बी पिकाचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार ३०५ हेक्टरवर रब्बीची लागवड पूर्ण होऊन जवळपास १२१ टक्के पेरण्यात करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच रब्बीच्या क्षेत्रात व पिकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील १६३३ गावांपैकी जेमतेम ११० गावांमध्येच रब्बीचा हंगाम घेतला जातो तर दीड हजाराहून अधिक गावांची भिस्त खरिपावर आहे. त्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाच्या पेरण्यादेखील शंभर टक्क्यापेक्षा अधिक झाल्या. तर यंदा पहिल्यांदाच नद्या, नाले दुथडी भरून वाहिले, त्याचबरोबर धरणेदेखील ओव्हरफ्लो होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. खरिपात शेतकऱ्यांना बंपर उत्पादन येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच आॅक्टोबरच्या अखेरीस अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सलग बारा दिवसांहून अधिक पावसाने हजेरी कायम ठेवली, त्यातून शेतकºयांच्या खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. त्याचबरोबर शेतात पाणी साचल्याने शेतकºयांचा रब्बी हंगाम लांबणीवर पडला. एरव्ही डिसेंबरमध्ये रब्बीच्या पेरण्या आटोपत असताना यंदा मात्र जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत शेतकºयांनी पेरण्या केल्या. जिल्ह्यात एक लाख १२ हजार ९१६ हेक्टर रब्बीचे क्षेत्र असले तरी, यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे नद्या, नाले, विहिरींना पाणी असल्यामुळे बहुतांशी शेतकºयांनी रब्बीसाठी जमिनीची मशागत करून पीक पेरणी केली. त्यामुळे जवळपास २४ हजार हेक्टर क्षेत्राची वाढ झाली. सर्वच्या सर्व क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे असून, यात प्रामुख्याने गहू, मका (स्विटकॉर्न) व हरभरा या तीन पिकांचा समावेश असला तरी, मध्यंतरी हवामान बदलाचा फटका हरभºयाच्या क्षेत्राला बसला. त्यामुळे यंदा हरभºयाचे क्षेत्र कमी होऊन त्याऐवजी शेतकºयांनी कांदा लागवडीला प्राधान्य दिले.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक