शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंताजनक बाब रावसाहेब कसबे : सावानातर्फे विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:31 IST

प्रतिभा माणसाला मिळालेली दैवी देणगी असून, अलीकडच्या काळात नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी (दि. १०) सावानातर्फे आयोजित वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.

ठळक मुद्देविविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण विविध उपक्रमांचा अहवाल सादर कलरफुल्ल होऊन जाऊया’ म्हणताच हशा

नाशिक : प्रतिभा माणसाला मिळालेली दैवी देणगी असून, अलीकडच्या काळात नवीन लेखक लिहिण्याचे धाडस करत नाहीत ही चिंतेची बाब असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी शुक्रवारी (दि. १०) सावानातर्फे आयोजित वाङ्मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी केले.वाचनालयाच्या १७७ व्या वार्षिक समारंभानिमित्त वाचनालयाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात रावसाहेब कसबे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध वाङ्मयीन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना कसबे यांनी आजच्या युवा पिढीला शिकविण्याची आवश्यकता आहे, असेही कसबे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, यावेळी संदीप राऊत यांना ललितेतर ग्रंथासाठी डॉ. वि. म. गोगटे पुरस्कार, गणेश मतकरी यांना उमेदीने कथा लिहिणाºया लेखकास डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार, डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांना सामाजिक लेखनाबद्दल मु. ब. यंदे पुरस्कार, नीलम माणगावे यांना पु. ना. पंडित पुरस्कार, कादंबरी लेखनासाठी श्रीरंजन आवटे यांना कै. धनंजय कुलकर्णी पुरस्कार, चरित्रात्मक कादंबरीसाठी माणिक कोतवाल यांना अशोक देवदत्त टिळक पुरस्कार, तर शैक्षणिक प्रवास ग्रंथास देण्यात येणारा ग. वि. अकोलकर पुरस्कार भीमराव भोयर यांना देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्क ारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे उपाध्यक्ष किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते, श्रीकांत बेणी, अ‍ॅड. भानुदास शौचे यांच्यासह पुरस्कारार्थी उपस्थित होते. अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी सावानातर्फे वर्षभर राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांचा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शंकर बोºहाडे यांनी केले. दरम्यान, वार्षिक महोत्सवांतर्गत शनिवारी (दि. ११) बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश मतकरी यांनी मनोगत व्यक्त करताना या पुरस्कारामुळे मी गोंधळून गेलो असल्याचे सांगितले. मी माझ्याच वडिलांच्या कथांचे संपादन केले आहे आणि सावानातर्फे डॉ. अ. वा. वर्टी कथालेखक पुरस्कार उमेदीने कथा लिहिणाºयाला देण्यात येत असल्याने मला हा पुरस्कार का देण्यात आला, हे अजूनही कळले नसल्याचे सांगितले. परंतु यावेळी पुरस्कारार्थींचा परिचय करून देत असताना किशोर पाठक यांनी ‘एका मतकरीने दुसºया मतकरीला मिळालेल्या पुरस्काराचा हा आनंद आहे’ असे सांगत प्रसंगाला विराम दिला.‘कलरफुल्ल होऊया’पुरस्कारार्थी आपले मनोगत व्यक्त करत असताना नाशिकच्या वातावरणाचा उल्लेख ओघाने आला आणि हाच धागा पकडत किशोर पाठक यांनी सावानातही आता कर्मचाºयांच्या गणवेशामुळे सर्व वातावरण गुलाबी झाले आहे आणि हे वातावरण पाहता पदाधिकाºयांनाही गणवेश असायला हवा असे सांगितले. यावेळी व्यासपीठावर बसलेले अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ ठेवा अशी सूचना केली. परंतु पाठक यांनी नुकत्याच झालेल्या फेरमतमोजणीनंतर आता आपल्याच पॅनलमधील सदस्य निवडून आलेले असताना कशाला हवे ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ असे म्हणत ‘कलरफुल्ल होऊन जाऊया’ असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.