महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेसह प्रश्नमंजूषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:18 AM2021-03-09T04:18:04+5:302021-03-09T04:18:04+5:30

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. ...

Quiz with Women's Day Rhetoric Competition | महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेसह प्रश्नमंजूषा

महिला दिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेसह प्रश्नमंजूषा

googlenewsNext

नाशिक : जागतिक महिला दिनानिमित्त युनिव्हर्सल फाउंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. या स्पर्धेतील स्पर्धकांना महिला सहायक पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे व तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करून गौरविण्यात आले.

महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पुष्पा निमसे यांनी समाजात वावरत असताना स्त्रियांनी स्त्रीयांचा मान सन्मान करण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना जीवनात पारदर्शकपणा घेऊन त्याग करायला शिकण्याचा सल्ला दिला. तर पल्लवी धात्रक यांनी चांगले आरोग्य राखण्यासाठी आहार, विहार नियमित व्यायाम, प्राणायाम यासह विविध खेळांचे महत्त्व पटवून सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येकाने वर्ष, सहा महिन्यातून आरोग्यविषयक तपासणी करून घेण्याचा सल्लाही दिला. दरम्यान, युनिव्हर्सल फाउंडेशनचे संस्थापक प्रा. राम खैरनार यांनी पुष्पा निमसे, पल्लवी धात्रक, कमल जाधव यांचा सन्मान स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला.

===Photopath===

080321\08nsk_78_08032021_13.jpg

===Caption===

महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरीत करताना पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे व तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, राम खैरनार.

Web Title: Quiz with Women's Day Rhetoric Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.