शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने नाशकात रस्त्यांवर वाहनांच्या रांगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 14:50 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले. त्यामुळे सोमवारी सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबईनाका, द्वारका, गंजमाळ, सीबीएस, शालीमारसाख्या महत्वाच्या ठिकाणी वाहनांची कोडीं होत असल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देलॉकडाऊमध्ये सोमवारी काहीशी शिथिलतारस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांची कसरतफिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे ठिकठिकाणी उल्लंघन

नाशिक :  कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊमध्ये सोमवारी काहीशी शिथिलता मिळाल्याने नाशकातील वेगवेगळ््या भागातील रस्त्यांवर सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी दिसून आली. तर द्वारका, मुंबईनाका व सीबीएससारख्या काही ठिकाणी अक्षरश: वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. राज्य सरकारने रविवारी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली. त्यानंतर नाशिक जिल्हा आणि शहरातही शिथिलता मिळण्याची नाशिककरांना अपेक्षा होती. त्यानुसार सोमवारी सकाळीच बहुतांश दुकाने खुली झाली. गेल्या महिनाभरापासून शहरातील सर्व व्यवसाय बंद असल्याने दुकानदार अगतिक झाले होते. अनेकांनी रविवारी (दि.३) दुकाने स्वच्छ करून उघडण्याची तयारी सुरू झाली होती. त्यातच कोणती दुकाने उघडावी आणि बंद ठेवावी याबाबत संभ्रम असतानाच दुकाने सुरू झाली. नाशिक शहरात रुग्ण संख्या मर्यादित असली तरी महापालिका क्षेत्र रेड झोनमध्ये आहे. रविवारी (दि. ४) रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील रेड झोन आणि आॅरेंज झोनची यादी घोषित केली, त्यात नाशिक महापालिका क्षेत्रासह सहा तालुके रेड झोनमध्ये घोषित करण्यात आले आहेत. त्यात अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दुकानांना परवानगी देण्यात आली असली तरी सोमवारी सकाळी शहरातील बहुतांशी दुकाने आणि व्यवसाय सुरू झाले.  झेरॉक्स व स्टेशनरी, हार्डवेअर, गॅरेज, सर्व्हिस स्टेशन्स आणि अन्य अनेक दुकाने सुरू झाले आहे. त्यामुळे सोमवारी सकाळपासून रस्त्यांवर अचानकपणे वाहनांची वर्दळ वाढल्याने मुंबईनाका, द्वारका, गंजमाळ, सीबीएस, शालीमारसाख्या महत्वाच्या ठिकाणी वाहनांची कोडीं होत असल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी पोलिसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कसरत करावी लागली, त्याचप्रमाणे अनेक नागरिकही  खेरदीसाठी बाजारपेठेत आल्याने कोरोना साथरोग काळात लागू करण्यात आलेल्या फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे ठिकठिकाणी उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी