शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात लसीकरणासाठी लागल्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 23:51 IST

देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देतालुक्यासाठी उपलब्ध झाल्या होत्या ३७०० लस

देवळा : देवळा तालुक्यासाठी कोविड-१९ लसीकरणासाठी ३७०० लसी उपलब्ध झाल्या होत्या. तालुक्यातील १४ केंद्रांवर शनिवारी (दि.२६) लसीकरण करून घेण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात युवकांमध्ये उत्साह दिसून आला. लोकांच्या प्रतिसादामुळे लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या.कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली होती. सुरुवातीला लस घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या नागरिकांमुळे लसीकरण केंद्रावर फारशी गर्दी दिसत नव्हती; परंतु आरोग्य विभाग, महसूल यंत्रणेने लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनतेमध्ये केलेल्या जनजागृतीचा सकारात्मक परिणाम झाला व सर्वत्र लसीकरणाची मागणी वाढू लागली; परंतु लसींच्या तुटवड्यामुळे नागरिकांना लसीकरण केंद्रावरील लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण न करताच परत जावे लागत होते. तालुक्यासाठी येणारा लसींचा साठा अपुरा पडत होता. यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. अखेर शनिवारी (दि.२६) तालुक्यासाठी ३७०० लसींचा पुरवठा करण्यात आल्यानंतर देवळा, भऊर, महाल पाटणे, रामेश्वर, मेशी, खुंटेवाडी, वाजगाव, लोहोणेर आदी १४ केंद्रांवर लसींचे वाटप करण्यात येऊन लसीकरण करण्यात आले. यावेळी १८ वर्षांपुढील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार असल्यामुळे अनेक केंद्रावर लसीकरणासाठी रांगा लागल्या होत्या.शहरासाठी एकच केंद्रदेवळा शहरासाठी अवघे एकाच ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरापासून दीड कि.मी. अंतरावर असलेल्या वाचनालयात सुरू झालेले लसीकरण केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता मध्यवर्ती ठिकाणी दुसरे लसीकरण केंद्र सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसtalukaतालुका