शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा अजूनही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:18 IST

शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाºया ग्राहकांची गर्दी होत असून, जनधन खात्यावर येणारी पेंशन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेंशन काढण्यासाठी बँकामध्ये येणाºया ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.

ठळक मुद्देनागरिकांसमोर आर्थिक अडचणी : खात्यातून पैसे काढण्यावर ग्राहकांचा भर

नाशिक : शहरातील विविध खासगी व सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम असून, अनेक ग्राहकांकडून कोरोनाच्या संकटकाळात कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी आपल्या खात्यावरील जमापुंजी काढण्याकडे कल दिसून येत आहेत. बँकांमध्ये खात्यातून पैसे काढणाऱ्या, मुदत ठेवी मोडून अथवा त्यावर कर्ज काढणाºया ग्राहकांची गर्दी होत असून, जनधन खात्यावर येणारी पेंशन अणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणारी पेंशन काढण्यासाठी बँकामध्ये येणाºया ग्राहकांचा ओघ अद्यापही सुरू आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीप्रमाणे बँकेत गर्दी होऊ दिली जात नसल्याने शहरातील विविध बँकांसमोर लांब लांब रांगा दिसून येत आहे.नाशिक शहरात लॉकडाऊनमध्ये टप्प्या टप्प्याने शिथिलता मिळत असताना नागरिकांच्या गरजाही वाढल्या असून, वैयक्तिक व कौटुंबिक गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकºया गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.अजूनही अनेक नागरिकांना एटीएम अथवा डेबिट कार्डचा वापर करता येत नाही. तसेच मोबाइल अ‍ॅपही वापरता येत नाही, असे ग्राहकही बँकेत पैसे काढण्यासाठी येत असल्याने बँकांसमोर ग्राहकांची गर्दी वाढली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकbankबँक