शस्रास्रे बाळगण्याच्या घटनांमध्ये वाढ
नाशिक : गेल्या आठवड्यात शहर परिसरात तसेच ग्रामीण भागातदेखील शस्रास्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांना कारवाई करावी लागली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून धारदार शस्रे तसेच गावठी पिस्तूल जप्त केल्याची कारवाई केली आहे. शस्रास्रे बाळगळ्याच्या या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फॅमिली डॉक्टरांसाठी निबंध स्पर्धा
नाशिक: फॅमिली फिजिशियन असोसिएशन आणि सुदर्शन हॉस्पिटलच्या वतीने फॅमिली डॉक्टरांसाठी निबंधलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कोविड-१९ वैश्विक संक्रमण नियंत्रणात फॅमिली डॉक्टरांचा सहभाग’ हा निबंधाचा विषय देण्यात आला आहे. कोविडसह जगताना डॉक्टर आणि रुग्णांपुढील आव्हाने आणि उपाय हादेखील दुसरा विषय देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. सुनंदा भोकरे, डॉ. पंकज देवरे, डॉ. संजय धुर्जड यांच्याशी संपर्क साधण्याचेे आवाहन करण्यात आले आहे.