शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वर्षासहलीवर प्रश्नचिन्ह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 00:31 IST

नाशिक : राज्य सरकारकडून ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत अनलॉकची घोषणा केली गेली असून, लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अभयारण्य, राखीव वनांमध्ये प्रवेश देण्याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसल्याने नाशिक वनवृत्तातील नाशिक, अहमदनगर, धुळे या जिल्ह्यातील सर्वच अभयारण्यांसह राखीव वनांमध्ये ‘टाळेबंदी’ कायम असल्याचे नाशिक वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे वर्षासहलीवरदेखील सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नाशिक : राज्य सरकारकडून ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत अनलॉकची घोषणा केली गेली असून, लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असले तरी अद्याप राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून अभयारण्य, राखीव वनांमध्ये प्रवेश देण्याबाबतचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नसल्याने नाशिक वनवृत्तातील नाशिक, अहमदनगर, धुळे या जिल्ह्यातील सर्वच अभयारण्यांसह राखीव वनांमध्ये ‘टाळेबंदी’ कायम असल्याचे नाशिक वन्यजीव विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे वर्षासहलीवरदेखील सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून लॉकडाऊनचे चार टप्पे पूर्ण करण्यात आले आहे. तेव्हापासून अद्याप नाशिक वन्यजीव विभागाकडूनदेखील नाशिक वनवृत्तातील तीनही जिल्ह्यांमधील अभयारण्ये, राखीव वनांची वाट पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. जुनअखेरपर्यंत प्रवेश बंद कायम राहणार असल्याचे नाशिक वनवृत्ताचे प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी सांगितले. जून महिना सुरू झाला असून, पावसाळ्याचे दिवसही उजाडले आहे. मागील दोन महिन्यांपासून नागरिकदेखील घरात बंदिस्त आहेत. कोरोना आजाराच्या संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. पावसाळ्यात वर्षा सहलीचे बेत आखण्यास नागरिकांची सुरुवात झाली असून, घरात बसून आलेला शीण घालविण्यासाठी नागरिकांना निसर्गरम्य ठिकाणी डोंगररांगांवर फेसाळणारे धबधबे आणि हिरवाईने नटलेला नयनरम्य परिसरात पर्यटनाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे.-------------------------अद्याप आदेश प्राप्त नाहीपावसाळी पर्यटनाचे बेत आखले जात आहेत; मात्र जूनअखेरपर्यंत तरी वनविभाग व वन्यजीव विभागाच्या अखत्यारितीत असलेल्या कुठल्याही राखीव वनांसह अभयारण्ये, गड-किल्ल्यांच्या परिसरात ट्रेकिंगसाठीदेखील जाता येणार नाही. कारण अद्याप याबाबत नवीन आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडून प्राप्त झालेला नाही.

टॅग्स :Nashikनाशिक