शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर खरेदी अडचणीत : चार वर्षांपासून निधी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:08 IST

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत योजना राबविण्यात महाराष्टÑात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर आला

ठळक मुद्देमका खरेदीदेखील अडचणीतप्रत्येक तालुक्याला गुदामांची गरज

नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत योजना राबविण्यात महाराष्टÑात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात शासकीय गुदामांचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जिल्ह्याला दरमहा लागणाºया धान्याची साठवणूक करण्यासाठी लागणारी जागेची उपलब्धता व प्रत्यक्षात गुदामांची साठवणूक क्षमता विचारात घेता सध्या सुरू असलेली मका खरेदीदेखील अडचणीत सापडली आहे. चार वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या २१ गुदामांपैकी शासनाने फक्त एकाच गुदामासाठी निधी दिल्याने अन्य २० गुदामांची उभारणी कागदोपत्री आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा रेशनमधून धान्याचे वाटप केले जाते. सदर धान्याची उचल प्रत्येक महिन्याला अन्नधान्य महामंडळातून करावी लागते व ते शासकीय गुदामात आणावे लागते. जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता, जवळपास ५३ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्यासाठी प्रत्येक तालुक्याला शासकीय गुदामांची गरज आहे.प्रत्यक्षात फक्त १७ लाख मेट्रिक टन इतके धान्य साठवण्याच्या क्षमतेचे गुदाम सध्या आहेत. त्यासाठी सन २०१३ मध्ये शासनाने सर्व जिल्ह्यांकडून तसे प्रस्ताव मागविले असता, नाशिकची गरज २१ गुदामांची असल्याचे कळविण्यात आले होते. त्यासाठी शासकीय जागाही शोधण्यात आल्या. शासनाने पहिल्या टप्प्यात सात गुदामांना मंजुरी देण्यात आली व त्यापैकीही फक्त देवळा तालुक्यातील एका गुदामासाठी सव्वा कोटी रुपये निधी देण्यात आला. त्यानंतर मात्र दरवर्षी शासनाकडे पाठपुरावा सुरू असतानाही शासनाकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. सध्या आहे त्या गुदामांमधील धान्य वितरित केल्यानंतर नवीन धान्याची वाहतूक केली जात आहे. त्यामुळेच नाशिक जिल्ह्यातील आठ मका खरेदी केंद्रांवर मक्याची खरेदी केली जात असून, खरेदी केलेला मका शासकीय गुदामात साठवण्याचे शासनाचे आदेश आहेत. आत्तापर्यंत ४० हजार मेट्रिक टन मक्याची खरेदी करण्यात आली असून, आणखी एक लाख मेट्रिक टन मका खरेदी करण्यात येणार आहे. परंतु गुदामांची क्षमताच नसल्याने काही तालुक्यांमध्ये मक्याची खरेदी थांबविण्यात आली आहे.