शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

सवाल : मनपाकडून व्यवहार्य भूमिकेचा अभाव, सवलतीच्या अन्य तरतुदींकडे दुर्लक्ष केवळ डॉक्टरच गुन्हेगार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 12:24 AM

नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही काय? - असे प्रश्न करीत, महापालिकेकडे व्यवहार्य भूमिकेचा अभाव असल्याचे मत शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देतरतुदी धाब्यावर बसवून सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम मिळणे बंद

नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही काय? - असे प्रश्न करीत, महापालिकेकडे व्यवहार्य भूमिकेचा अभाव असल्याचे मत शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी व्यक्त केले. काही व्यावसायिकांकडून जाणीवपूर्वक अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाच्या महाराष्टÑ अग्निसुरक्षा कायद्यातच एकदा भोगवटा प्रमाणपत्र दिल्यानंतर नव्याने ना हरकत घेण्याची तरतूद नाही. असे असतानाही अशा तरतुदी धाब्यावर बसवून सोयीनेच कायद्याची अंमलबजावणी केली जात असल्याचा आरोप केला आहे.नाशिक महापालिका अग्निशमन कायदा (२००९) आणि रुग्णालयां संदर्भातील सुरक्षेचा कायदा (२०१३-१४) यांची एकत्रित अंमलबजावणी पूर्वलक्षी पद्धतीने करीत असून, त्यामुळेच वैद्यकीय व्यावसायिकांच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे अडचणीचे झाले आहे. त्यातच आता मेडिकल इन्शुरन्स अ‍ॅथॉरिटीने मुंबई शुश्रूषा कायद्यान्वये नोंदणी बंधनकारक केल्याने रुग्णांची मेडिक्लेम पॉलिसीची रक्कम मिळणे बंद झाले आहे.या सर्वाचा मागोवा घेताना डॉक्टर आणि महापालिका यांच्यातील वादाचा फटका रुग्णांना बसतो आहे. परंतु त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने राज्यात कुठेही नाही अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी पद्धतीने म्हणजेच कायदा होण्याच्या अगोदरच्या इमारतींनाही नियम लावल्याने व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ज्यांच्याकडे महापालिकेची नोंदणी नाही अशा प्रकारचे सर्व डॉक्टर बोगस ठरवले जात असल्याने एकूणच या प्रकरणात वैद्यकीय व्यावसायिकांची मानहानी होत असल्याचा आरोपही आहे. माझ्या वडिलांनी १९७० साली पंचवटी कारंजावर रुग्णालय बांधले. त्यावेळी ते पंचवटी गावठाण होते. त्यावेळी प्रचलित कायद्याप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत. असे असताना आता नव्या नियमांची सक्ती करण्यात आली. या रुग्णालयावर दहा हजार लिटर आणि जमिनीवर पाच हजार लिटर्सची पाण्याची टाकी बांधावी असा महापालिकेचा नियम आहे. गावठाण भाग असल्याने भिंतीला भिंत खेटून मिळकती आहेत. त्यातच लोडबेअरिंगचे जुने बांधकाम आहे, त्यावर टाकी कशी उभारणार? स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र घेऊन ते मी मनपाच्या अग्निशमन दलाला दिले; परंतु त्यावर कोणेतही उत्तर नाही. केवळ तोच तो कायद्याचा कागद दाखवतात. वास्तविक, महाराष्टÑ अग्निसुरक्षा कायद्यानुसार एकदा मनपाने भोगवटा प्रमाणपत्र दिले याचा अर्थ ती इमारत सुरक्षितता आणि अन्य सर्व नियमानुसार वापरायोग्य आहे. मग अशा इमारतींना नवीन नियम कसे लागू होऊ शकतात? पंचवटी कारंंजावरील मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयात अग्निसुरक्षेचे कोणते नियम पाळले गेले आहेत?- डॉ. शोधन गोंदकर, रामालयम हॉस्पिटल, पंचवटी