शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्याची राणी नागलीला मिळावी प्रतिष्ठा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 16:32 IST

पेठ : शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वाधिक पौष्टिक समजल्या जाणाऱ्या व धान्याची राणी म्हणून ओळख असलेल्या नागली पिकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पेठ तालुक्यात नागालीवर प्रक्रियाउद्योग सुरू होण्याची आवश्यकता असून, शासनाच्या विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प सादर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविकेल तेच पिकेल : आदिवासी भागात नागलीवर प्रक्रिया उद्योगांची गरज

पेठ : शारीरिक तंदुरुस्तीसाठी सर्वाधिक पौष्टिक समजल्या जाणाऱ्या व धान्याची राणी म्हणून ओळख असलेल्या नागली पिकाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी पेठ तालुक्यात नागालीवर प्रक्रियाउद्योग सुरू होण्याची आवश्यकता असून, शासनाच्या विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प सादर करण्यात आला आहे.पेठ ,सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नागली हे प्रमुख पीक असून, दैनंदिन आहारातही या धान्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डोंगर उतारावर व हलक्या जमिनीत हे पिक घेतले जात असून, नागलीवर करण्यात येणारे प्रक्रियाउद्योग या भागात नसल्याने वर्षानुवर्षे नागली फक्त भाकरीसाठीच वापरली जात आहे. शहरी भागात दुर्मीळ असणारी नागली जेथे पिकते तेथे मात्र दुर्लक्षित असून, नागालीला नवसंजीवनी देण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शासनाच्या विकेल तेच पिकेल या अभियानात पेठ तालुका कृषी विभागाच्या वतीने नागली प्रक्रियाउद्योग प्रकल्प शासनाला सादर करण्यात आला आहे.पेठ तालुक्यात जवळपास ७ हजार १२४ हेक्टर क्षेत्रावर नागलीची लावणी केली जात असून, साधारण ५ हजार ६६४ टन उत्पादन येते. अजून नागलीला पाहिजे तसा भाव व महत्त्व नसल्याने शेतकरी घरातील मागील वर्षाचेच बियाणे वापरून रोपं तयार करत असल्याने उत्पादनाची मर्यादा घटली आहे.केवळ निसर्गावर अवलंबून असलेल्या या पिकावर कोणत्याही प्रकारची रासायनिक खते वापरली जात नसल्याने ते पूर्णपणे सेंद्रिय आहे. नागलीपासून भाकर, पेज, भरडा, पापड, बिस्कीट, चिक्की यासह विविध पदार्थ तयार केले जात असून, स्थानिक ठिकाणी असे प्रक्रियाउद्योग सुरू केल्यास नागालीलाही सुगीचे दिवस नक्कीच येतील .(१९पेठ२)--------असे आहेत नागलीचे गुणधर्मनागली उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम, लोह, प्रथिने, तंतुमय जीवनसत्त्व, खनिजे असल्याने शरीरास पौष्टिक आहे. नागलीच्या सेवनाने रक्ताशयसारखे आजार कमी होतात, शिवाय हाडांच्या मजबुतीसाठीही नागली उपयुक्तअसते. लहान मुलांना नागलीची पेज अथवा बिस्कीट दिली जातात. त्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.पेठ तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर नागली पिकवली जात असली तरी केवळ भाकरी करून जेवणात वापर करण्यापलीकडे तिचा फारसा वापर होताना दिसून येत नाही. आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान असलेल्या नागली पिकाचा कृषी विभागाच्या वतीने सविस्तर अभ्यास करून विकेल तेच पिकेल अभियानांतर्गत प्रोजेक्ट तयार करून शासनाला सादर करण्यात आला आहे.-अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती