शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

बायकांच्या भांडणात लांबला अंत्यविधी ; दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:22 IST

नांदगाव : ‘इस्टेट’ने काढली समजूतनांदगाव : दोन बायकांशी लग्न केलेल्या नवºयावर जिवंतपणी कटू प्रसंग ओढावला जात असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु मेल्यानंतर दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ आल्याचा किस्सा येथे घडला.

ठळक मुद्देबायकांच्या भांडणात लांबला अंत्यविधीदोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ

नांदगाव : ‘इस्टेट’ने काढली समजूतनांदगाव : दोन बायकांशी लग्न केलेल्या नवºयावर जिवंतपणी कटू प्रसंग ओढावला जात असल्याचे सर्वश्रुत आहे; परंतु मेल्यानंतर दोन बायकांच्या वादात अंत्यविधीसाठी मृत नवºयाला (कलेवर) कित्येक तास वाट बघण्याची वेळ आल्याचा किस्सा येथे घडला.मालेगाव तालुक्यातील जेऊर येथील इसमाने नांदगाव व जळगाव बु. येथील दोन महिलांशी विवाह केला होता. दोघींनाही त्याच्यापासून अपत्य प्राप्तीसुद्धा झाली. जिवंतपणी दोन्हीकडचे संसार लौकिकार्थाने व्यवस्थित होते. नवºयाच्या मृत्यूनंतर झाकलेल्या गोष्टी उघड झाल्या. या दु:खद घटनेला एकदम वेगळे वळण लागले. दोघींनी अंत्यविधी माझ्याच गावी झाला पाहिजे असा आग्रह धरला. अर्थातच ज्याच्या त्याच्या नातेवाइकांनी त्यावर रीदेखील ओढली. कोणीच कोणाचे ऐकेना. शेवटी वाद विकोपाला गेला.रस्त्यावर चालू गाडीतून पडून मृत्यू झाल्याने मृताचे शवविच्छेदन करण्यात आले होते. अंत्यविधी कोणत्या गावी करायचा या विवादामुळे बाहेर गर्दी झाली. अनेक तास वादविवाद सुरू होते. दोघींनीही समजूतदारपणाने प्रश्न सोडविण्याचे आवाहन पोलिसांनी केले. पोलीस दोन्हीकडच्या नातेवाइकांना हा प्रश्न सामंजस्याने सोडवा असा सल्ला देऊन थकले; पण दोन्ही बाजूंकडे ऐकण्याची मन:स्थिती नव्हती. याचवेळी काही कागदपत्रे आणण्यात आली. कोर्टाचा निवाडा कोणाच्या बाजूने यावर हमरीतुमरी झाली. पण मार्ग काही निघेना. शासकीय पद्धतीने अंत्यसंस्कार करावे इथपर्यंत विचार झाला. पण त्यालाही विरोध करण्यात आला.अखेर अंत्यविधी कुठेही करा, पण मालमत्ता व संपत्तीचा हिस्सा त्यावरून ठरणार नाही, असा मोलाचा सल्ला वकिलांकडून मिळाला आणि अंत्यविधीचे ग्रहण सुटले. पण आता दोन्हीकडे नको. मयताच्या गावी जेऊर येथेच अंत्यसंस्कार करावेत असे ठरले आणि त्याची अंमलबजावणीही झाली.