शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुक्यात तीन ठिकाणी क्वॉरण्टाइन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:05 IST

आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांनी दिली.

सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून, तालुक्यात तीन ठिकाणी क्वॉरण्टाइन सेंटर उभारण्यात आले आहेत. तालुक्यातील आगासखिंड येथील शताब्दी इंजिनिअरिंग महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे (इंडिया बुल्स) वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात क्वॉरण्टाइन सेंटर सुरू करण्यात आले असून, प्रत्येक केंद्रावर १५० क्वॉरण्टाइन बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार राहुल कोताडे, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे यांनी दिली.तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला असून, संबंधित रुग्ण ज्यांच्या संपर्कात आला असेल अशा नागरिकांची तपासणी करण्यात येणार असून, ज्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असतील अशा व्यक्तींना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्यासाठी आगासखिंड येथील शताब्दी महाविद्यालय, मुसळगाव शिवारात रतन इंडियाचे वसतिगृह व वावी येथील गोडगे पाटील विद्यालयात विलगीकरण केंद्र उभारण्यात येत असून, प्रत्येक ठिकाणी सुमारे १५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी विलगीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी वसतिगृहाची इमारत असून, बऱ्याच सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कमी मनुष्यबळात जास्त लोकांच्या विलगीकरणाची व्यवस्था होणार आहे.गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड या विलगीकरण कक्षाच्या नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून, ग्रामसेवक, आरोग्य विभाग व इतर पंचायत समितीतील यंत्रणा त्यांना सहाय्य करणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य