शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

 गुणवत्ता सुधार : सद्यस्थितीत ३३ शाळांनी गाठले लक्ष्य महापालिकेच्या ७३ शाळा वर्षाअखेर ‘अ’ श्रेणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:10 IST

महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.

ठळक मुद्देमहापालिकेच्या एकूण १२७ शाळा ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त

नाशिक : महापालिका शाळांची गुणवत्ता व दर्जाबाबत नाके मुरडणाºयांना आश्चर्याचा धक्का बसावा अशी कामगिरी शाळांकडून सुरू असून, शासनाच्या ‘प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ’च्या धोरणानुसार ‘शाळासिद्धी’ अंतर्गत महापालिकेच्या ३३ शाळा ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या आहेत.डिसेंबर २०१७ अखेर त्यात आणखी ४० शाळांची भर पडणार असल्याचा दावा शिक्षण विभागाकडून केला जात असून, फेब्रुवारी २०१८ अखेर सर्वच्या सर्व १२७ शाळाही ‘अ’ श्रेणीबद्ध होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या एकूण १२७ शाळा आहेत. ‘शाळासिद्धी’ अंतर्गत १२५ गुणांची परीक्षा घेतली जाते. महापालिकेच्या शिक्षण विभागाने शासनाच्या धोरणानुसार गुणवत्ता कक्ष स्थापन केला होता. त्यानंतर एक थीम तयार करून प्रत्येक शाळाला एक तक्ता देण्यात आला. सदर तक्त्यानुसार त्या-त्या शाळांनी स्वयंमूल्यमापन केले. त्यामध्ये ८० पेक्षा अधिक गुण मिळविणाºया ५ शाळा आढळून आल्या. ज्या शाळांना ८० च्यावर गुण मिळतात त्या शाळा ‘अ’श्रेणीमध्ये पोहोचतात. त्यानंतर मनपाच्या शिक्षण विभागाने ७० ते ८० गुण मिळविणाºया २३ शाळांकडे लक्ष केंद्रित केले. त्यांना पंधरा दिवसांचा कार्यक्रम आखून देण्यात आला असता त्यांनी लक्ष्य गाठले आणि या २३ शाळाही ‘अ’ श्रेणीत जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत मनपाच्या ३३ शाळांना ‘अ’ श्रेणी प्राप्त झालेली आहे. ५० ते ७० या दरम्यान गुण मिळविणाºया ४० शाळा असून, त्यांच्याकडे आता लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सदर शाळा डिसेंबर २०१७ अखेर ‘अ’ श्रेणीपर्यंत जाऊन पोहोचतील, असा विश्वास मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी व्यक्त केला आहे. महापालिकेच्या सर्वच्या सर्व शाळा गुणवत्तेच्या दृष्टीने सक्षम करण्याचा प्रयत्न आकाराला येत असल्याचेही उपासनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.