ओझरटाऊनशिप : घरासमोर उभ्या असललेल्या महिलेजवळ पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकल थांबवुन अज्ञात दोघां पैकी एकाने महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत व अर्धा तोळा वजनाची साखळी असे तिन तोळे ७२ हजार किमतीचा अैवज घेऊन मोटारसायकलवरु न पलायन केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ओझर येथील निवृत्तीनाथ नगर येथे घडली.आज दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास सुषमा दतात्रय कुलकर्णी राहाणार निवृत्तिनाथ नगर ओझर या त्यांच्या घरासमोर उभ्या असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरु न आलेल्या अज्ञात दोघांनी मोटारसायकल थांबवुन कमल टिचर कोठे राहातात असे हिंदीतुन विचारले त्याच दरम्यान मोटारसायकलवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व सोनसाखळी असा तिन तोळे वजनाचा अैवज हिसका मारून तोडून घेवुन मोटारसायकल वरून पलायन केले असल्याची तक्र ार कुलकर्णी यांनी नोदविल्यावरु न ओझर पोलिसानी अज्ञात दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास पोलिस. उप निरीक्षक प्रकाश बोराडे करीत आहेत.
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेची सोन्याची पोत लांबविली
By admin | Updated: September 2, 2016 22:55 IST