शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आकाशाला गवसणी घाला

By admin | Updated: January 17, 2016 22:45 IST

प्रशांत खंबासवाडकर : वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नाशिक : गोखले एज्युकेशन सोसायटी संचलित एचपीटी आटर््स आणि आरवायके सायन्स कॉलेज यांच्यातर्फे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा आणि विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. युनिव्हर्सल ग्रुप, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख पाहुणे प्रशांत खंबासवाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कठोर मेहनत करण्याचे तसेच आपल्या घरापासून दूर राहून आकाशाला नक्कीच गवसणी घालता येईल, याबाबत आवाहन केले.यावेळी खंबासवाडकर यांनी बीवायके महाविद्यालयात शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच भूतकाळात जे क्षण आपण जगतो ते विसरता कामा नये, अशा क्षणांभोवती पुन्हा फिरून चांगले आयुष्य घडविण्यासाठी ‘कम्फर्ट झोन’ तोडून नाशिकबाहेर पडण्याचे अधोरेखित केले. सभागृहांमध्ये कार्यक्रमांच्या आयोजनासाठी पुरेशी जागा नसल्याने महाविद्यालयातील कार्यक्रमांसाठी मोठ्या सभागृहाची आवश्यकता असून या सभागृहाचे २०१८ साली गोखले एज्युकेशन सोसायटीच्या शतकपूर्ती महोत्सवात लोकार्पण करण्यात येऊन या सभागृहाला ‘गुरुदक्षिणा’ नाव देण्यात येणार असल्याचेही खंबासवाडकर यांनी सांगितले.यावेळी वर्षभरात वेगवेगळ्या स्पर्धा, तसेच परीक्षांमधून यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्वाेत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुरेश नखाते, सर्वाेत्कृष्ट विद्यार्थिनी भक्ती आठवले यांचादेखील सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी, प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य रूपन सिंग , डॉ. एस. आर. खंडेलवाल, आर. टी. आहेर आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी, तर अहवाल वाचन सुरेश नखाते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रणव रत्नपारखी, डॉ. लिना हुन्नरगीकर, डॉ. उदया बारसकर यांनी केले. (प्रतिनिधी)