शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मतदार याद्यांची शुद्धीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:21 IST

निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निवडणूक अधिकाºयांशी संवाद साधत निवडणूक याद्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नाशिक : निवडणुकांच्या काळात मतदार याद्यांमध्ये दिसून येणाऱ्या त्रुटी आणि दोष दूर करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले असून, राज्याचे निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी मंगळवारी (दि. २७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील निवडणूक अधिकाºयांशी संवाद साधत निवडणूक याद्यांची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. आगामी काळात होणाºया लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही तयारी सुरू झाल्यामुळे प्रशासनाकडून मतदारांची नोंदणी वाढविण्यासोबतच मतदार याद्या सुसज्ज करणे, दुबार नोंदणी वगळणे या कामांना लागले आहे. लोकसभा निवडणुका पुढील वर्षभरामध्ये होणार असून, यावेळी होणाºया मतदानाच्या वेळी मतदार यादीमध्ये त्रुटी राहू नयेत, या उद्देशाने निवडणूक आयोग एक वर्ष आधीच कामाला लागले आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ४५ लाख मतदारांपैकी १० हजार ४४५ मतदारांकडे कृष्णधवल छायाचित्रांचे ओळखपत्र आहेत. या ओळखपत्रांवर रंगीत छायाचित्र अद्ययावत करण्याचे काम सध्या निवडणूक विभागाकडून सुरू असून, सुमारे २२०० रंगीत छायाचित्रे निवडणूक विभागाकडे जमा झाली आहेत. तर सुमारे १ लाख १२ हजार मतदारांच्या ओळखपत्रांवर छायाचित्रच नाहीत. यापैकी सुमारे २० हजार छायाचित्रे निवडणूक विभागाकडून या छायाचित्रांसह अद्ययावत ओळखपत्रे निवडणूक विभागाला दिली जाणार आहेत. उर्वरित मतदारांशी संवाद साधून त्यांच्या रंगीत छायाचित्रांसह ओळखपत्र अद्ययावत करून मतदार यादी शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया सुरू असून, एप्रिलअखेर मतदार याद्यांचे १०० टक्के शुद्धीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे.मतदार यादीत  चुकांची शृंखलामतदार यादीतील माहितीमध्ये मतदाराचे प्रथम नाव व आडनाव रिकामे असणे, चुकीची अक्षरे असणे, यादी भाग नसणे, घर क्र मांक नसणे, चुकीचे वय, मतदारांच्या नातेसंबंधांमध्ये योग्य शब्द नसणे असे काही दोष आहेत. छायाचित्रांचे अद्ययावत करण्यासोबतच शुद्धीकरण मोहिमेत हे दोषही काढणे आवश्यक असताना काही भागात याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.नवीन मतदार  नोंदणीकडे दुर्लक्षमतदार शुद्धीकरण प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाचे कर्मचारी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधत असताना अनेक तरुणांकडून मतदार नावनोंदणीसाठी विचारणा होत असते. परंतु, शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान नवीन मतदार नोंदणीक डे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नवमतदार त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय