शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या गावाला जाण्याची इच्छा झाली पुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 00:19 IST

नाशिक : खरे तर दरवर्षी सुटीत मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करणाऱ्या मुलांसाठी यंदा मामाचे गाव दूरच राहिले. कोरोनामुळे शाळेची संपूर्ण सुट्टी घरीच गेली. जिल्हाबंदीमुळे प्रवासाला परवानगीच नसल्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातही मुलांना मामाचे गाव गाठता आले नाही. परंतु बसेस सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मामाच्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या मुलांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. कंडक्टरने डबल बेल दिली आणि बस सुरू होताचा मुलांनी जल्लोषच केला.

ठळक मुद्देबच्चे कंपनी खूश । गाडी स्थानकातून सुटताच मुलांचा जल्लोष

नाशिक : खरे तर दरवर्षी सुटीत मामाच्या गावाला जाऊन धम्माल मस्ती करणाऱ्या मुलांसाठी यंदा मामाचे गाव दूरच राहिले. कोरोनामुळे शाळेची संपूर्ण सुट्टी घरीच गेली. जिल्हाबंदीमुळे प्रवासाला परवानगीच नसल्याने जिल्ह्यातील जिल्ह्यातही मुलांना मामाचे गाव गाठता आले नाही. परंतु बसेस सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मामाच्या गावाला जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या मुलांच्या चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. कंडक्टरने डबल बेल दिली आणि बस सुरू होताचा मुलांनी जल्लोषच केला.जिल्हांतर्गत बसेस सुरू झाल्यानंतर शहरातील जुने सीबीएस स्थानकातून तालुका पातळीवरील शटल बसेस सुरू करण्यात आल्या. सटाणा बसमध्ये खिडकीजवळची सीट पकडून बसलेल्या दोघा मुलांचा उत्साह अजिबात लपत नव्हता. कुठे निघाला बच्चे कंपनी, असे त्यांना विचारले असता त्यांनी एका सुरात मामाच्या गावाला चाललो असे सांगितले. इतके दिवस घरातच अडकून पडलेल्या मुलांना मामाच्या गावाला जाण्याचा आनंद होताच बसमध्ये बसल्याचा दुहेरी आनंदही त्यांच्या चेहºयावरून चमकून गेला. गेल्या पाच महिन्यांपासून संपर्काची नाळ तुटल्यामुळे एकमेकांची ओढ लागलेली मने बससेमुळे जुळूुन येतील, असे आश्वासक हावभाव त्या मुलांच्या चेहºयावर तरळत होते.रक्षाबंधनाला तरी मामाचा गाव गाठता येईल अशी या मुलांची अपेक्षा होती. परंतु जिल्हाबंदीमुळे बहिणींना भावाच्या गावी जाता आले नव्हते, अनेकांनी खासगी वाहनांचा पर्याय शोधला; परंतु त्यांना अन्य सर्व तपासण्यातून जावे लागतले.गावागावाला आणि मनामनाला जोडणाºया एसटीला याचमुळे महाराष्टÑाची जीवनवाहिनीही म्हटले जाते. बसमध्ये बसून मामाच्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गेल्या पाच महिन्यांनी प्रवासी आणि चालक -वाहकांनी देखील माणुसकीचा जिवंतपणा अनुभवला.

टॅग्स :Bus DriverबसचालकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स