शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिक मायक्रॉन मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 00:45 IST

पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिहाय मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

नाशिक : पावसाळ्यात प्लॅस्टिकमुळे चेंबर्स तुंबून शहर जलमय होण्याच्या प्रकारामुळे महापालिकेने प्लॅस्टिक विरोधी मोहीम व्यापक करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रांची खरेदी करण्यात आली आहे. विभागनिहाय मोहीम राबवून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करणाºयांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  प्लॅस्टिक पर्यावरणाला घातक ठरू लागल्याने राज्य सरकारनेही त्याविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्रीस बंदी असतानाही सर्रासपणे त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. यंदा पावसाळ्यात शहरातील रस्ते जलमय होण्याचे खापर महापालिकेच्या बांधकाम विभागाने प्लॅस्टिकवरच फोडले होते. भुयारी गटारींवरील ढापे, चेंबर्स यामध्ये प्लॅस्टिक अडकून रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार नाशिककरांनी या पावसाळ्यात वारंवार अनुभवले. त्यावेळी आरोग्य विभागाने दोन दिवसांत तब्बल ४६ टन प्लॅस्टिक आढळून आल्याचा दावा केला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील सहाही विभागांत स्वच्छता निरीक्षकांमार्फत प्लॅस्टिकविरोधी कारवाई करण्यात येते. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक मापनासाठी महापालिकेकडे यापूर्वी ५ ते ६ यंत्रे होती. त्यामुळे बºयाचदा मापनात अडचणी येऊन सरसकट कारवाई केली जात होती. परंतु, आता राज्य शासनच प्लॅस्टिकबंदीबाबत कठोर बनले असताना महापालिकाही सतर्क झाली असून, मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी महापालिकेने पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लॅस्टिक मापनासाठी ५० यंत्रे खरेदी केली आहेत. प्रत्येक विभागाला ८ यंत्रे दिली जाणार असून, त्यामुळे कारवाईला गती प्राप्त होणार असल्याचा दावा आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी केला आहे. दीड लाखांचा दंड वसूल महापालिकेने एप्रिल २०१७ पासून आतापर्यंत सहाही विभागात प्लॅस्टिकविरोधी मोहीम राबवित ५६० किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे. या मोहिमेतून १ लाख ६९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकची विक्री करताना आढळून आल्यास पहिल्यांदा पान हजार रुपये दंड वसूल केला जातो. पुन्हा विक्री करताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड केला जातो. मात्र, त्यानंतरही विक्री करताना आढळून आल्यास गुन्हे दाखल केले जाणार आहेत.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी