शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

देवळ्यात दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 23:22 IST

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन नसल्यामुळे वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.

देवळा : तालुक्यातील वाजगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार सूचना देऊनही नागरिक नियमांचे पालन नसल्यामुळे वाजगाव ग्रामपंचायतीने आता कडक पाऊल उचलले असून, नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला.तालुक्यालगत असलेल्या मालेगाव तालुक्यात कोरोना संक्रमित रु ग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील अनेक गावात युवकांनी पुढाकार घेऊन गावात प्रवेश करण्याचे मार्गावर अडथळे निर्माण करून नाकेबंदी केली आहे. बाहेरगावाहून येणाºया वाहनांना तसेच नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे.पंधरा दिवसांपूर्वी पोलिसांच्या मदतीने वाजगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन कोरोनाचा संसर्ग होण्यास कारण ठरणाºया गावठी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करत कोरोनाशी युद्ध करण्यास ग्रामपंचायत प्रशासन सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. यानंतर बाहेरगावाहून तसेच कंटेन्मेंट झोनमधून गावात राहण्यासाठी येणारे नागरिक, अनोळखी नागरिकांचा गावात होणारा संचार, तसेच गावातीत अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानात वाढू लागलेली गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे होणारे उल्लंघन, मास्क न वापरणे आदींमुळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. नागरिक ग्रामपंचायत प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र निर्माण झाले.गावातील प्रवेश मार्गावर बाहेरगावाहून येणाºया नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे. दि. १४ ते १७ मे या कालावधित गावातील सर्व किराणा, भाजीपाला, पिठाची चक्की, मास विक्र ी आदी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यावसायिकांना सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवण्याची वेळ ठरवून देण्यात आली. यावेळी ग्रामसेवक जे. व्ही. देवरे, आरोग्य विभागाचे प्रशांत सोनवणे, अमोल देवरे, गिरीश आहेर, यशवंत देवरे, रामचंद्र गवळी, विनोद देवरे, साहेबराव देवरे, सुनील देवरे, वैजनाथ देवरे, संदीप देवरे, आबा देवरे, शैलेंद्र देवरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.----------------------बैठकीत निर्णयतोंडाला मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले असताना अनेक ग्रामस्थ वारंवार सूचना देऊनही मास्कचा वापर करत नसल्यामुळे अशा व्यक्तींना १०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात येऊन मास्कचा वापर न करणाºया २५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ग्रामपंचायतीने याची गंभार दखल घेत मंगळवारी सरपंच प्रकाश मोहन, उपसरपंच दीपक देवरे यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात आले. कंटेन्मेंट झोनमधून आल्याची माहिती न नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Nashikनाशिक