लासलगाव : येथील मर्चटस को आॅप बॅकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे यांचा कर्ज परतफेडीचा १,७५,००० रूपयांचा धनादेश न वटल्याने निफाडचे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एस बी.काळे यांनी सहा महिने कारावास व एक लाख पंच्याहत्तर हजार रूपये दंडाची व दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने कैदेची शिक्षा ठोठावली. लासलगाव मर्चंटस को आॅप बॅकेचे कर्जदार गणेश आत्माराम चांदोरे यांनी तीन लाख रूपये रक्कमेचे कर्ज ३० मार्च २०१३ रोजी घेतले. परंतु या कर्ज वेळेवर भरले नाही. त्यामुळे कर्ज थकित झाले. थकीत कर्जरक्कम भरण्यासाठी बँकेचे वसुली अधिकाऱ्यांना मर्चंटस को आॅप बॅक लिमीटेड या बॅकेचा १२ फेब्रुवारी २०१६ रोजीचा धनादेश नंबर ३६५०५ हा रक्कम रूपये १,७५,००० रूपयांचा दिला होता.परंतु खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने हा धनादेश न वटता परत आला. फिर्यादी बॅकेचे वतीने अॅड. सुभाष एस. देशमुख यांनी कामकाज पाहिले.
धनादेश न वटल्याने कर्जदारास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 14:41 IST