नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरांचा उपद्रव थांबता थांबत नसून पुन्हा उपेंद्रनगर भागात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मंगल संजय हाडोळे (४१,रा.उपेंद्रनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुचाकीस्वार चाेरट्यांनी मंगळवारी (दि.२६) भरदुपारी हाडोळे यांच्याजवळ दुचाकी नेऊन पाठीमागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यावर हात मारला आणि ५० हजार रुपये किमतीची १८ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून धूम ठोकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सिडकोमध्ये पुन्हा सोनसाखळी खेचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 00:53 IST