शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दारणेच्या पाण्यासाठी कॉँग्रेसचा पूजापाठ व आरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 17:45 IST

सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला.

सिन्नर : दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी कॉँग्रेसच्यावतीने दारणा नदीची आरती करुन पूजापाठ करण्यात आला. दुष्काळी सिन्नर तालुक्याला दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी मिळावे, यासाठी दारणा नदीपात्रातून पाण्याचा कलश भरुन आणण्यात आला. सदर कलश तालुकाभर फिरवून जनजागृती करुन पाण्यासाठी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ‘पाणी आमच्या हक्काचं..’ अशा घोषणा देत कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातात झेंडे घेऊन निदर्शने केली.कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली गोपाळ गायकर, कैलास दातीर, कमलाकर शेलार, दामू शेळके, पुंजाराम हारक, अर्जून घोरपडे, बाळासाहेब दळवी, तानाजी भोर, नामदेव वाजे, कचरु पवार, बबन जाधव यांच्यासह कॉँग्रेसचे कार्यकर्ते या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.मराठवाड्यापेक्षाही भयानक दुष्काळ सिन्नर तालुक्यात असतांना हक्काचे पाणी सिन्नरला डावलून नेले जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. भौगोलिकदृष्टया सिन्नर तालुका उंचावर असल्याने व आत्तापर्यंत महत्त्वकांक्षी नेतृत्त्व न मिळाल्याने सिन्नरकरांना १५ किलोमीटर अंतरावर दूर असणाऱ्या दारणा नदीपात्रातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याचे कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले. आत्तापर्यंत शेतकºयांची पाण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. दुष्काळामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न बळीराजासमोर आहे. दारणाचे पाणी कोनांबे धरणात टाकून देवनदी व देवनदीच्या उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे काढून शेती सुजलाम् सुफलाम करता येऊ शकते असे शिंदे यांनी सांगितले. तसेच म्हाळुंगी नदीचे पाणी पिंपळे शिवारात तवल्या बंधाºयात अडवून डुबेरेच्या जगबुडी बंधाºयात टाकून या भागातील शेतीला फायदा होऊ शकतो. मात्र सक्षम नेतृत्त्व न लाभल्याने तालुका शेतीच्या पाण्यापासून वंचित असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.दारणा व म्हाळुंगी नदीचे पाणी शेतीसाठी सिन्नर तालुक्याला मिळावे, यासाठी सदर आंदोलन करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. दारणा नदीपात्रात भरलेला कलश तालुकाभर फिरवून शेतीचे पाणी मिळावे यासाठी जनजागृती करणार असल्याचे शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :Waterपाणी