शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भगूरला सरकारी जागेवर पोल्ट्रीफार्म, पक्की घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:15 IST

भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रीडांगण आरक्षित सरकारी भूखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्रीफार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अ‍ॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.

भगूर : भगूर नगरपालिका हद्दीतील सर्व्हे नं. ९४५ या क्रीडांगण आरक्षित सरकारी भूखंडावर अनधिकृत कब्जा करून झोपडपट्टी वसविण्यात आली असून, त्यात पोल्ट्रीफार्मसह अवैध धंदे सुरू असल्याची तक्रार अ‍ॅड. विशाल गोरखनाथ बलकवडे यांनी केली आहे.या संदर्भात बलकवडे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भगूरमधील सर्व्हे नं.९४५ हा शासनाच्या अखत्यारित येत असून या जागेवर नगरपालिकेने क्रीडांगणाचे आरक्षण टाकल्याचा ठराव पारित केला आहे. मात्र काही झोपडपट्टीवासीयांनी या जागेवर अतिक्रमण करून वसाहतीसह अवैध धंदे सुरू केले.  याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही सदर अतिक्रमण हटविले जात नाही. या जागेच्या लगत राम मंदिर असून तीन शाळा व एक व्यायामशाळा आहे. अतिक्रमित जागेवर गावठी दारू, तंबाखू, गुटखा विक्रीचे अवैध धंदे सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे  भवितव्य धोक्यात येऊ पहात  आहे.सावरकरांची जन्मभूमी असलेल्या या नगरीत देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र येथील बकाल अवस्थेमुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत असल्याचे म्हटले आहे.बांधकाम विभाग अधिकारी, कर्मचा-याविनाबलकवडे यांनी सार्वजनिक जागेवरील अतिक्रमणाबाबत माहिती अधिकारात जाणून घेतले असता, मुख्याधिकाºयांनी नगर परिषदेकडे २०१७ पासून कायमस्वरूपी अभियंता नाही व बांधकाम विभागाकडे एकही कर्मचारी नसल्याने कारवाई करणे शक्य झाले नसल्याचे उत्तर दिले. त्यामुळे येथील प्रशासन त्यांच्या कामात कसूर करत असल्याने त्यांच्या विरोधात भादंवि १६६ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असे बलकवडे यांनी सांगितले.कारवाई करण्याचे आश्वासनसरकारी भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केले असल्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिले जाईल. यात नगरपालिका कोणालाही पाठीशी घालणार नाही. शासनाने अतिक्रमणाबाबत कडक धोरण अवलंबिले असून भगूरमध्येदेखील याबाबत निश्चितपणे कठोर कारवाई होईल.- प्रतिभा पाटील, मुख्याधिकारी

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक