शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नंबरप्लेट्सद्वारे पीयूसी केंद्रांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:14 IST

अधिकारी वाहनांच्या बनावट नंबरप्लेट वापरून पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि पुन्हा त्याच केंद्रांना अडचणीत आणण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला असून, गेल्या रविवारी असाच एक प्रकार घडल्याचे समजते.

नाशिक : अधिकारी वाहनांच्या बनावट नंबरप्लेट वापरून पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्याचा आणि पुन्हा त्याच केंद्रांना अडचणीत आणण्याचा प्रकार शहरात वाढीस लागला असून, गेल्या रविवारी असाच एक प्रकार घडल्याचे समजते.पीयूसी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या वाहनाची आणि चालकाची संपूर्ण माहिती नोंद करून त्यानंतर संपूर्ण तपासणीअंती प्रमाणपत्र दिले जाते. असे असतानाही काही अपप्रवृत्तीचे लोक प्रमाणपत्र  मिळाल्यानंतर संबंधित पीयूसी केंद्र आणि आरटीओला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतात. याचा त्रास या केंद्र संचालकांना होत असून, वाहनांवर अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या नंबर प्लेट लावून नंतर त्या केंद्रांना वेठीस धरले जात असल्याच्या तक्रारीदेखील समोर आल्या आहेत. पीयूसी म्हणजेच मोटारींसाठी मिळणारे प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र. अशा प्रकारचे प्रमाणपत्र वाहनधारकाला उपलब्ध व्हावे यासाठी शहरात ठिंकठिकाणी पीयूसी केंद्रे सुरू करण्यात आली असून, त्यांना प्रादेशिक परिवहन महामंडळाची मान्यतादेखील आहे. महामंडळाचे अधिनियम आणि गुणवत्ता निंयंत्रणानुसार या पीयूसी केंद्रांचे कामकाज असून, प्रमाणित केलेल्या वाहनांची संपूर्ण माहिती आरटीओला सादरही करावी लागते. गेल्या काही महिन्यात चुकीच्या लोकांकडून अनेक ठिकाणी बनावट क्रमांकाच्या वाहनांच्या साह्याने पीयूसी प्रमाणपत्र रितसर काढण्यात आले आणि नंतर तो वाहन क्रमांक मोठ्या अधिकाऱ्याच्या वाहनाचे असल्याचे सांगून पीयूसी केंद्रांकडे बोट दाखविण्यात आले. यापूर्वी जिल्हाधिकारी आणि आता मनपा आयुक्तांच्या वाहनाच्या नावाने असेच पीयूसी प्रमाणपत्र काढून आरटीओची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले असून, यात पीयूसी केंद्रांची फसवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसNashikनाशिक