शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जनता युतीला त्यांची जागा दाखवेल

By admin | Updated: September 27, 2016 02:00 IST

राजाराम पानगव्हाणे : कॉँग्रेसचा तालुका मेळावा उत्साहात

नाशिक : आगामी निवडणुकांमुळे जनता भाजपा-शिवसेना युतीला त्यांची जागा दाखवून धडा शिकवणार आहे. नाशिक तालुका हा कॉँग्रेसच्या विचारांचा तालुका असल्याने या तालुक्यातून सातत्याने कॉँग्रेसचे सदस्य निवडून येत असल्याचे प्रतिपादन कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी केले.आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तसेच नवीन तालुकाध्यक्ष नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर येथील कॉँग्रेस भवनात नाशिक तालुका कॉँग्रेसच्या मेळाव्याचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राजाराम पानगव्हाणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नूतन तालुकाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, विधानसभा प्रभारी श्याम तायडे, जिल्हा उपाध्यक्ष रतन जाधव आदि उपस्थित होते. पानगव्हाणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेला भूरळ घालणाऱ्या भाजपा-शिवसेना युतीचा दोन वर्षांचा कार्यकाळ जनतेने पाहिला आहे. त्यामुळे मतदार आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला धडा शिकवून त्यांची जागा दाखवतील. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सांगितले की, माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला जाणार नाही. बैठकीचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण लोखंडे यांनी केले. आभार अंबादास ढिकले यांनी मानले. कार्यक्रमात नंदकुमार कर्डक, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. अकबर सय्यद, माजी नगरसेवक लक्ष्मण मंडाले, अ‍ॅड. इलियास खतीब, जिल्हा सरचिटणीस प्रशांत बाविस्कर, पी. के. जाधव, बी. डी. करंजकर, मोहन करंजकर, अ‍ॅड. अशोक आडके, पंचायत समिती सदस्य प्रकाश बदादे, पांडुरंग काकड, अविनाश गायकवाड आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)