शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनेचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:42 IST

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे.

सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामासाठी चक्क सार्वजनिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामपंचायत प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत गावातील ग्रामस्थांनी याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून चौकशी करण्याची मागणी निवेदनात केली आहे.गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांची दोडी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भेट घेवून तक्रार केली आहे. मनेगावसह सोळा गाव नळपाणी पुरवठा योजनेतून गावाला पाणी पुरवठा केला जात आहे. योजनेचे पाणी गावातील सार्वजनिक विहिरीत सोडण्यात येते व त्यानतंर गावात वितरित केले जाते. दोडी ग्रामपंचायत मार्फत ग्रामनिधीतून सर्व्हीस रोड ते जलशुद्धीकरण शेडपर्यंत रस्त्याचे काम सुरु आहे. सदर कामावर संबंधित ठेकेदार मुरूम दाबण्यासाठी सार्वजनिक विहीरीतील पाण्याचा राजरोसपणे वापर केला जात असल्याने एकप्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. तालुक्यात व येथे दुष्काळी परिस्थिती असून माणसांचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना अशाप्रकारे पाण्याचा गैरवापर केला जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सदरचा टँकर हा सहा हजार लिटर क्षमतेचा असून असे पंधरा ते वीस टँकरच्या खेपा सदर कामासाठी वापरण्यात आल्या असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.

टॅग्स :Waterपाणी