शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सोनाबे सोसायटीत जनसेवा पॅनल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 23:15 IST

ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती.

ठळक मुद्देविरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान

ठाणगाव : सोनांबे विकास सोसायटीची निवडणूक होऊन जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व स्थापित केले. तर विरोधी समर्थ पॅनलला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले तर एक जागा यापूर्वीच बिनविरोध निवडण्यात आली होती.सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार यांनी जनसेवा पॅनलची निर्मिती केली तर, माजी सरपंच केरु पवार यांनी समर्थ पॅनल तयार करुन दोघांमध्ये सरळ- सरळ लढत होऊन जनसेवा पॅनलने बारा जागांवर निर्वाचित वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सर्वसाधारण कर्जदार या गटातून जनसेवा पॅनलचे पंडित रामू घोडे , रामनाथ पांडुरंग डावरे , तानाजी रामभाऊ पवार , सुदाम आनंदा पवार , ज्ञानेश्वर बळवंत बोडके , ज्ञानेश्वर बाबूराव पवार , प्रवीण जयराम पवार , सुरेश निवृत्ती पवार हे विजयी झाले.

यादव भीमा घोडे, एकनाथ सुखदेव कडभाने, उत्तम गोविंद जगताप, भाऊसाहेब विठ्ठल पवार, पुंजा मुरलीधर पवार, सदाशिव रंभू पवार, वामन तुकाराम पवार, पिरअहमद पापामिया पठाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महिला राखीव गटातून जनसेवा पॅनलच्या द्रौपदाबाई कारभारी बोडके (३३५), राधाबाई दुर्गेश पवार (३५१) या विजयी झाल्या तर समर्थ पॅनलच्या पुष्पाबाई संपत बोडके व मिराबाई एकनाथ पवार यांचा पराभव झाला. अनुसूचित जाती जमाती मधून समर्थ पॅनलचे गोविंद जगन्नाथ डगळे (३४९) हे एकमेव विजयी झाले तर जनसेवाचे दत्तू विठोबा डगळे यांचा पराभव झाला.इतर मागास प्रवर्ग गटातून जनसेवा पॅनलचे खंडू पंढरी पवार (३४८) हे विजयी झाले तर, समर्थचे जनार्दन लक्ष्मण पवार यांचा पराभव झाला. भटक्या जाती विमुक्त जमाती मधून रामभारती नामदेव गोसावी हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर विष्णू वारुंगसे, नाना पवार, शंकर पवार, किरण घोडे, ज्ञानेश्वर पवार, ज्ञानेश्वर बोडके, दामू बोडके, संजय बोडके विकास पवार,सुभाष जोर्वे,योगेश पवार, विकास पवार, कैलास पवार, शरद कडबाने,योगेश पवार,राजाराम पवार आदींनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनीता लोखंडे यांनी काम पाहिले.सोनांबे विकास सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलने बारा जागा जिंकून निर्वाचित वर्चस्व मिळविल्यानंतर जल्लोष करतांना जनसेवा पॅनलचे नेतृत्व करणारे डॉ. रवींद्र पवार, विकास पवार, विष्णू वारुंगसे, नाना पवार आदी. (२८ सोनांबे)

टॅग्स :talukaतालुकाElectionनिवडणूक