शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा - अमर दुर्गुळे 

By suyog.joshi | Updated: September 21, 2023 14:12 IST

प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात नागरिकांनी निर्माल्य आपल्या जवळपासच्या कोणत्याही नदीपात्रात टाकू नये. महानगर पालिकेच्या निर्माल्य कुंडातच टाकावे. प्रदूषण टाळण्यासाठी परिसरात निर्माण होणारा कचरा जाळू नये, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाशिकचे उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

यावेळी दुर्गुळे म्हणाले, नाशिक शहरामधील हवेचे प्रदूषण शक्यतो करून धूलीकण वाढल्याने दिसून येते. यामध्ये रस्त्यांची झालेली दुरवस्था व मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक यामुळे धुळीचे कण पुन्हा पुन्हा हवेमध्ये तरंगत राहतात. तसेच, शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, जुन्या वस्तू पाडणे यामधून निघालेला चिखल यांच्या वाहतुकीमुळे धूलीकण वाढण्याची शक्यता असते. 

शहरात होणारी वाहतूक कोंडी ती सुद्धा प्रदूषणात भर घालते. यावर उपाययोजना म्हणून रस्त्यांची नियमित दुरुस्ती, साफसफाई करणे आवश्यक आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळणे व वाहतुकीचे सामान नेणारी नियमावली करून बंदिस्त वाहतूक करणे. वाहतूक योग्य नियंत्रण करणे आदी गोष्टी आवश्यक आहेत. नाशिक जिल्ह्यातील सातपूर व अंबड औद्योगिक परिसरामध्ये उद्योगामध्ये फरनेस ऑइल वापरणे बंदी आहे. 

त्यामुळे उद्योगाने हरित इंधन तसेच, एलपीजी, सीएनजी या इंधनाचा वापर करण्याबाबत पुढाकार घेतला असून, मोठ्या तसेच मध्यम दहा ते १२ उद्योगांनी त्यांच्या उद्योगामध्ये हरित इंधनाचा वापर सुरू केला आहे. तसेच सातपूर, अंबड परिसरामध्ये गॅस पाइपलाइन याद्वारे उद्योगांना, इंधनपुरवठा करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड यांनी पाइपलाइन केलेली आहे. तसेच सदर इंधनामुळे हवेचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रियानाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये छोट्या व मध्यम उद्योगांकडे स्वत:ची सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा असून, प्रक्रियाकृत सांडपाणी हे पुन्हा उद्योगामध्ये काही प्रमाणात वापरले जाते. तर काही उर्वरित पाणी हे बागांसाठी वापरले जाते. तसेच ११० उद्योगांनी त्यांच्या उद्योगातून निर्माण होणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून कचऱ्याचे पाणी हे पुन:श्च वापरून न वापरणे योग्य पाणी त्याचे बाष्पीभवन करून शून्य निकष प्रक्रिया केली जाते. परंतु औद्योगिक परिसरामध्ये निर्माण होणारे घरगुती सांडपाणी (टाॅयलेट व इतर वापर) याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी तसेच ते वाहून नेण्यासाठी कोणतीही सयंत्रणा नसल्याने बऱ्याच वेळा ते घरगुती सांडपाणी हे व आजूबाजूचे सांडपाणी हे नाल्यातून नदीत मिसळते. त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे दुर्गुळे यांनी सांगितले.

मनपाने सांडपाणी प्रक्रिया अद्ययावत करावेबराच वेळा जलमल वाहून नेणाऱ्या वाहिन्या या फुटल्यामुळे किंवा ओव्हर फ्लो झाल्यामुळे ते सांडपाणी नाल्यातून नदीत मिसळते. तसेच बऱ्याच घरगुती संकुलांचे सांडपाणी हे सांडपाणी वाहून नेणाऱ्या व्यवस्थेशी जोडले नसल्याने ते पाणी नदीत मिसळते. त्यावर मनपाने तत्काळ उपाययाेजना करणे गरजेचे आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने औद्यागिक सांडपाणी यंत्रणा (सीईटीपी) ही लवकरात लवकर उभारणी करणे आवश्यक आहे. सध्या अस्तित्वात असलेली महानगरपालिकेचे जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) अद्ययावत करणे आवश्यक आहे. जेणेकरून सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी हे इतर दुय्यम वापरासाठी तसेच रस्ते सफाई किंवा दुय्यम औद्योगिक वापर किंवा बांधकाम व्यवसायामध्ये त्याचा पुन:श्च वापर करता येऊ शकतो, असेही ते शेवटी म्हणाले.

पर्यावरण जागृतीराज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे स्वच्छ अभियानांतर्गत सायकल रॅली काढण्यात आली. त्यात राज्यभरातील सायकलपटूंनी सहभाग घेतला. त्यातून हवेत प्रदूषण होऊ नये म्हणून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करावा, असा संदेश देण्यात आला. राज्यभरात सुमारे २० हजार कागदी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Nashikनाशिक