शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

स्वच्छ शहर लौकीक टिकवण्यासाठी लोकसहभाग आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:09 IST

नाशिक- देशाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक चा क्रमांक देशात अकरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. मात्र, हा लौकीक कायम टिकवायचा ...

ठळक मुद्देडॉ. कल्पना कुटे यांची माहिती : स्वच्छता दिनी करा संकल्प घरगुती कच-यावर घरीच करा विल्हेवाट

नाशिक- देशाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिक चा क्रमांक देशात अकरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. मात्र, हा लौकीक कायम टिकवायचा असेल तर लोकसहभाग आवश्यक आहे. घरगुती कच-यावर प्रकिया करण्यात नागरीक आणि व्यवसायिकांचा सहभाग आवश्यक आहे. असे मत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी व्यक्त केले. महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी स्वच्छतेचे महत्वअधिक प्रकर्षाने सांगितले जाते.स्वच्छ शहर सर्वेक्षणात नाशिकची कामगिरी अत्यंत चांगली आहे. ती टिकवून ठेवण्यासाठी आणि केवळ स्पर्धा नव्हे तर निरोगी आयुष्यासाठी स्वच्छतेला महत्व दिले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.

प्रश्न- केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणातील यशानंतर आता काय स्थिती आहे?

डॉ. कुटे- नाशिक महापालिकेने गेल्यावर्षी चांगली कामगिरी केली आता हा लौकीक टिकवण्याचा आणि अधिक चांगली कामगिरी करण्याच निर्धार आहे. सन २०२०-२१ यावर्षाचे सर्वेक्षण सुरू झाले असून दोन त्रैमासिकांचे मुल्यमापनजवळपास संपले आहे. आता नवनवीन निकषांबरोबरच गेल्या वेळी जाणवणा-या उणिवा दुर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार बांधकामाचे निरूपयोगी साहित्यावर प्रक्रिया करण्याच्या कामाचा प्रामुख्याने समावेश आहे. याकामासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

प्रश्न- महापालिका शहर स्वच्छतेसाठी नवीन कोणते प्रकल्प राबवित आहे?

डॉ. कुटे: महापालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनाबरोबरच अन्य कच-याचीही विल्हेवाट लावली जाते. आता ई कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी एका खासगी कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा कचरा नष्ट करणे किंवा रिसायकल करणे यासंदर्भात देखील काम सुरू होऊ शकेल. सध्या मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही याबरोबरच अन्य ई कचरा मोठ्या प्रमाणात निघतो. तो शास्त्रोक्तपध्दतीने नष्ट करण्यात येईल. त्याच बरोबर कचऱ्याबरोबर येणारे सॅनेटरी नॅपकिन्स, डायपर, बेबी पॅडस देखील योग्य पध्दतीने नष्ट करण्यासाठी देखील प्रस्ताव आहे.

प्रश्न- लोकसहभाग किती आवश्यक आहे आणि त्याची काय तयारी सुरू आहे?

डॉ. कुटे- स्वच्छता हा खरे तर लोकसहभागाचाच विषय आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणात देखील याबाबत अनेक अटी आहेत. घरगुती स्वरूपात अनेक नागरीक घरातील कच-याचे कंपोस्ट खत तयार करतात. परंतु त्यापलिकडे जाऊन दोनशे पेक्षा अधिक घरांची हाउसिंग स्कीम असेल तर विकासकांना कच-याची निर्गत करणे बंधनकारक आहे. हॉटेल्सबाबत देखील नियम आहेत. शहरातील काही मोठे हॉटेल्स कच-याची विल्हेवाट परीसरातच करतात. परंतु सर्वांनीच ती केली पाहिजे. कच-याची निर्मिती झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे किंवा कच-यापासून काही तरी वेगळे तयार करणे, रिसायकल करणे याला खूपच महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे नागरीक आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

मुलाखत- संजय पाठक 

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाGovernmentसरकार