देवळा : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या रु ग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ नागरीकांची चिंता वाढविणारी असून हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देवळा तालुक्यात बुधवार दि. ३० सप्टेंबरपासून मंगळवार दि. ६ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, व्यापारी बांधव तसेच संपूर्ण जनतेने जनता कर्फ्युत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यातआलेआहे.देवळा तालुक्यात सातत्याने कोरोनाच्या रु ग्णांमध्ये वाढ होत असून आतापर्यंत कोरोनामुळे १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सद्यस्थितीत कोरोनाची साखळी तोडण्याची गरज असून कोरोनापासून मुक्तता मिळविण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांशी चर्चा करून आगामी सात दिवसांसाठी स्वयंस्फूर्तीने "जनता कर्फ्यु" करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु लागू करावा अशी मागणी करण्यात आल्याने बुधवार दि. ३०सप्टेंबर पासून दि. ६ आॅक्टोबरपर्यंत देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला असल्याची माहिती केदा आहेर यांनी यावेळी दिली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, उमराणा बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, उपनगराध्यक्ष अतुल पवार, गटनेते अशोक आहेर, जितेंद्र आहेर, किरण आहेर, पंकज आहेर, काकाजी आहेर, मुन्ना आढाव, प्रतीक आहेर आदींसह सर्व व्यापारी बांधव उपस्थित होते.देवळा नगरपंचायतीने देखील कोरोना संक्र मण रोखण्यासाठी कडक पाऊल उचलले असून शहरात विना मास्क आढळणाऱ्या व्यक्ति कडून ५०० रु पये दंड वसुल करण्यात येणार आहे. तसेच शहरातील व्यापारी त्यांच्या दुकानातून ग्राहकांना सामानाची विक्र ी करतांना आढळुन आल्यास सदर व्यापाऱ्यांकडून ५००० रु पये दंड वसुल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:24 IST
देवळा : देवळा तालुक्यातील कोरोनाच्या रु ग्णांमध्ये झपाट्याने होणारी वाढ नागरीकांची चिंता वाढविणारी असून हि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देवळा तालुक्यात बुधवार दि. ३० सप्टेंबरपासून मंगळवार दि. ६ आॅक्टोबरपर्यंत जनता कर्फ्युचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी, व्यापारी बांधव तसेच संपूर्ण जनतेने जनता कर्फ्युत सहभागी होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यातआलेआहे.
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देवळा तालुक्यात जनता कर्फ्यु
ठळक मुद्दे शहरात विना मास्क आढळणाऱ्या व्यक्ति कडून ५०० रु पये दंड वसुल करण्यात येणार