शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
3
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
4
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
5
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
6
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
7
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
8
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
9
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
10
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
11
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
12
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
13
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
14
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
15
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
16
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
17
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
18
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
19
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
20
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?

निमा विमेन्स फोरमतर्फे महिलांसाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:43 IST

निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले.

नाशिक : निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले.डॉ. पारिख यांनी स्त्रियांच्या या विशेष दिवसातील काळजी घेण्याचे महत्त्व व त्याची गरज अधोरेखित केली. वाव सोशल ग्रुपच्या अश्विनी नेहारकर, रेखा देवरे यांच्या ग्रुपने सॅनिटरी नॅपकीनची योग्य विल्हेवाट काळाची गरज यावर मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ता अश्विनी चौमल यांनी सॅनिटरी नॅपकीनला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कपची माहिती व त्याचा वापर याविषयी माहिती दिली. राजश्री गांगुर्डे या प्रमुख पाहुण्या म्हणून कार्यक्र मास उपस्थित होत्या व त्यांनी शासनामध्ये मासिक पाळी स्वच्छतेविषयी काय तरतूद आहे त्याची माहिती दिली.यावेळी मासिक पाळीच्या विषयावर निर्भीडपणे समोर येऊन आपल्या समस्या विचार मांडण्याची काळाची गरज आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनला पर्याय साधनांचा गांभीर्याने विचार करावा, असे विमेन्स फोरमच्या अध्यक्ष डॉ. प्रणीता गुजराती यांनी नमूद केले.सूत्रसंचालन दीप्ती बढे यांनी केले. यावेळी डॉ. श्रुती कुलकर्णी, डॉ. प्रतिभा वाघ आदींसह फोरमच्या सदस्य उपस्थित होत्या.

टॅग्स :NashikनाशिकMIDCएमआयडीसी